(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
२४ फेब्रुवारी रोजी त्याने आपल्या X अकाउंटवर लिहिले, “हा संदेश फक्त माझ्या श्रोत्यांसाठी आहे. जर तुम्ही माझे श्रोते नसाल, तर कृपया हे वाचू नका आणि उजवीकडे स्वाइप करू नका. ही नम्र विनंती आहे.”
This message is just for my listeners
please dont read and swipe right now if you are not my listener, its a humble request. Hello beautiful people! ❤️
I just want to tell you all that I love you.
Thank you so much for your kindness in this ruthless world.
Although I have… — WhoamI (@Atmojoarjalojo) February 24, 2026
अरिजीतने पुढे लिहिले की, त्याने नवीन असाइनमेंट्स घेणे थांबवले असले तरी चाहत्यांना त्याचा आवाज ऐकायला मिळत राहणार आहे. गायकाने आपल्या न मध्ये लिहिले की, “नमस्कार प्रिय लोकांनो, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. या निर्दयी जगात तुमच्या प्रेमासाठी आणि नम्रतेसाठी मनःपूर्वक आभार. जरी मी नवे प्रोजेक्ट स्वीकारणे थांबवले असले, तरी माझी अनेक गाणी अजून येणार आहेत. मला अजून बरीच गाणी पूर्ण करायची आहेत. लोकांना वारंवार समजावण्यात वेळ वाया घालवू नका. किती वेळा समजावणार? इतकी अधुरी गाणी आहेत की ती पूर्ण होताच प्रदर्शित होत राहतील. कदाचित संपूर्ण वर्षभर, कदाचित पुढील वर्षापर्यंतही. त्यामुळे शांत राहा. या प्लॅटफॉर्मपासून थोडं दूर राहण्याचा प्रयत्न करा. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, वाचा, प्रेम करा, ध्यानधारणा करा. जय देवी.” असे लिहून गायकाने ही पोस्ट शेअर केली आहे.
The Kerala Story 2 चा टीझर चर्चेत येताच निर्मात्यांनी केला डिलीट? नेमकं सत्य काय आले समोर
अरिजीतचे आणखी एक ट्विट चर्चेत
अरिजीत सिंगने पुन्हा ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले की, ‘आणि मग पुढे काय होईल कोण जाणे?’ अरिजीत सिंगने २७ जानेवारी रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने लिहिले होते, “हॅलो, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. इतक्या वर्षांपासून श्रोते म्हणून मला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आता मी प्लेबॅक व्होकलिस्ट म्हणून कोणतेही नवे असाइनमेंट स्वीकारणार नाही. हा प्रवास इथेच थांबवत आहे. हा प्रवास अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय राहिला आहे.” ही बातमी ऐकताच त्याचे चाहते निराश झाले. परंतु आता अरिजीतच्या नव्या ट्विटनुसार त्याची आणखी गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.






