Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“हंपी” नंतर प्रकाश कुंटे यांचा नवा कौटुंबिक चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; ठाण्यात मुहूर्त संपन्न

दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांचा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे नाव आणि चित्रपटामधील कलाकारांची नवे अजूनही गुलदस्त्यात आहेत. ते जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 06, 2026 | 12:27 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • “हंपी” नंतर प्रकाश कुंटे यांचा नवा चित्रपट
  • चित्रपटाचा ठाण्यात मुहूर्त संपन्न
  • प्रकाश कुंटे यांच्या चित्रपटाचे नाव गुलदस्त्यात
 

मराठी चित्रपटसृष्टी सध्या नव्या वळणावर येऊन पोहोचली असून आशय, मांडणी आणि सादरीकरणाच्या चौकटी मोडत नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. बदलत्या काळानुसार मराठी सिनेमातही वेगवेगळ्या लोकेशन्सचा वापर आणि त्यानुसार कथानकाची रचना याला अधिक महत्त्व मिळू लागलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळं आणि दर्जेदार पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर, वेगळ्या आणि मनाला भिडणाऱ्या विषयांसाठी ओळख असलेले दिग्दर्शक प्रकाश कुंटे आता प्रेक्षकांसाठी एक नवा कोरा कौटुंबिक चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचं नाव सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आलं असलं, तरी नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त ठाणे येथे पार पडला असून, चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

‘Dhurandhar 2’ चा 19 व्या दिवशीही ऐतिहासिक विक्रम; ₹1000 कोटींची कमाई करणारा ठरला पहिला चित्रपट

या चित्रपटाची निर्मिती मानस्मिता प्रॉडक्शन आणि स्वरूप स्टुडिओज यांच्या बॅनरखाली होत आहे. डॉ. स्मिता नलावडे आणि मंगेश नलावडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर सचिन नारकर, विकास पवार आणि प्रभाकर परब सहनिर्माते म्हणून काम पाहणार आहेत. स्वरूप स्टुडिओजने यापूर्वीही अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती केली असून, त्यांच्या या नव्या प्रोजेक्टकडूनही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

चित्रपटाची कथा नितीश बुधकर यांनी लिहिली असून, पटकथा आणि संवाद लेखन नितीश बुधकर, आदित्य प्रकाश भगत आणि विभव राजाध्यक्ष यांनी संयुक्तपणे केलं आहे. तांत्रिक बाजूही तितकीच मजबूत ठेवण्यात आली असून विव्हियन गायकवाड सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत, तर रोहित राऊत चित्रपटाला संगीत देणार आहेत. अतुल साळवे कार्यकारी निर्माता म्हणून या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत.

सोशल मीडियाला ‘उलटीचा पॉट’ म्हणत Paresh Rawal यांनी केली टीका; ‘धुरंधर 2’ वादामुळे रंगली चर्चा

विशेष म्हणजे, या चित्रपटातील कलाकारांची नावं अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. मात्र, दमदार कलाकारांची फौज या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या प्रोजेक्टबद्दल उत्सुकता आणखी वाढली आहे. प्रकाश कुंटे यांनी याआधी हाताळलेले विषय हे प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे आणि वास्तववादी होते. त्यामुळे त्यांच्या या नव्या कौटुंबिक चित्रपटातून ते कोणती वेगळी कथा मांडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकंदरीत, मराठी सिनेमातील नव्या प्रवाहाला पुढे नेणारा आणि आशयघनतेला प्राधान्य देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे. आता फक्त चित्रपटाचं नाव आणि कलाकारांची घोषणा कधी होते, याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Web Title: Prakash kunte new marathi family film announcement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:27 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!
1

Veen Doghantali Hi Tutena : समर-स्वानंदीच्या आयुष्यात येणार नवा बहर; फुलणार सुखी संसार, मालिकेत पाहायला मिळणार नवा ट्विस्ट!

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी
2

Khatron Ke Khiladi 15 Winner: अविनाश मिश्राने मारली बाजी! धाडसी स्टंटच्या जोरावर ऋत्विक,ओरीला मागं टाकत पटकावली विजेतेपदाची ट्रॉफी

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार
3

Yami Gautam-Aditya Dhar: यामी गौतम-आदित्य धरचा मोठा निर्णय? मुंबई सोडून हिमाचलमध्ये २५ एकरांवरील जुन्या घरात थाटणार संसार

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन
4

Love and God: २३ वर्षे लागली सिनेमा पूर्ण होण्यासाठी; रिलीजआधीच दिग्दर्शकासह २ कलाकारांचं निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.