Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर

ZEE5 मराठी अनेक वेगवेगळ्या कथा घेऊन येत आहे आणि आता यामध्ये फ्रेम या चित्रपटाच्या प्रिमीयरची भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 04, 2026 | 12:01 PM
फ्रेमचा १० जुलै रोजी प्रिमियर

फ्रेमचा १० जुलै रोजी प्रिमियर

Follow Us
Follow Us:
  • मराठी चित्रपटाला नक्कीच सुगीचे दिवस आले आहेत 
  • वेगळे विषय आणि उत्तम अभिनय पहायला मिळत आहे 
  • मराठी ZEE5 खूपच वेगळे विषय हाताळताना दिसत आहे 
मराठी ZEE5ने ‘फ्रेम’या आपल्या आगामी ओरिजिनल चित्रपटाची घोषणा केली आहे. व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील नाजूक सीमारेषेचा वेध घेणाऱ्या या प्रभावी सामाजिक चित्रपटाच्या कथानकात सतत नैतिक मूल्यांची कसोटी घेण्यात आली आहे. विक्रम पटवर्धन यांनी लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटात नागराज मंजुळे, अमेय वाघ, मुग्धा गोडसे आणि अक्षया गुरव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

फोटो जर्नालिझमच्या माध्यमातून शोकांतिकेचे चित्रण करताना त्यासाठी मोजावी लागणारी भावनिक आणि नैतिक किंमत हा या चित्रपटाचा मध्यवर्ती विषय आहे. चित्रपटाचा प्रीमियर 10 जुलै 2026 रोजी मराठी ZEE5वर होणार आहे.

OTT प्रेमींसाठी मेजवानी! ‘या’ आठवड्यात OTT वर मनोरंजनाचा डबल धमाका; ‘कॉकटेल 2’सह ६ चित्रपट पाहण्यासाठी सज्ज

 “फ्रेम” मध्ये काय बघायला मिळणार?

‘फ्रेम’ हा एक प्रभावी सामाजिक चित्रपट असून तो व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील नाजूक सीमारेषेचा वेध घेतो. नैतिकतेची सतत परीक्षा घेणाऱ्या आणि योग्य-अयोग्य यांच्यातील सीमा अनेकदा धूसर होणाऱ्या परिस्थितीचे वास्तवदर्शी चित्रण या चित्रपटात आहे. पुण्यातील एका वृत्तपत्राच्या न्यूज रूमच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या कथेत अनुभवी छायाचित्र पत्रकार चंदू पानसरे आणि आदर्शवादी नवोदित सिद्धार्थ देशमुख यांच्या प्रवासातून व्यावसायिक कर्तव्य आणि संवेदनशीलता यांच्यातील संघर्ष उलगडला जातो. “आधी फोटो, मग बाकी सगळं” या भूमिकेवर ठाम असलेला चंदू आणि माणुसकी जपत पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करणारा सिद्धार्थ यांच्यातील विचारांचा संघर्ष या चित्रपटाचा गाभा आहे.

विचारांची कसोटी 

विनाशकारी भूकंपामुळे या दोघांच्या परस्परविरोधी विचारांची खरी कसोटी लागते. मृत्यू, विध्वंस आणि जगण्यासाठीच्या संघर्षाने व्यापलेल्या परिस्थितीत ते सापडतात. ढिगाऱ्याखाली दबलेल्या आयुष्यांचे, अपरिमित दुःखाचे आणि आशेचे क्षण कॅमेऱ्यात टिपताना निरीक्षकाची भूमिका आणि प्रत्यक्ष सहभागी असलेल्या व्यक्तीची भूमिका यांच्यातील सीमारेषा हळूहळू धूसर होत जाते. प्रत्येक छायाचित्र टिपायचे की नाही, या निर्णयासोबत त्यांना स्वतःच्या मूल्यांचा पुनर्विचार करावा लागतो. मानवी दुःखाचे साक्षीदार होण्याची आणि त्याचे दस्तावेजीकरण करण्याची भावनिक व नैतिक किंमत त्यांना अनुभवावी लागते.

 फ्रेम’वेगळा का ठरतो?

एखाद्या घटनेचे वार्तांकन करताना पत्रकार आणि छायाचित्र पत्रकारांसमोर उभ्या राहणाऱ्या नैतिक द्विधा मनःस्थितीचा वेध घेणारी कथा. अनुभवी, कट्टर प्रोफेशनल आणि या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू पाहणारा नवोदित यांच्यातील विचारसंघर्षाचे प्रभावी चित्रण. छायाचित्रणाच्या माध्यमातून सत्य, जबाबदारी आणि संकटकाळातील माध्यमांची भूमिका यांचा वेध. न्यूजरूमच्या चौकटीपलीकडे जाऊन मथळ्यांमागील आणि ब्रेकिंग न्यूजमागील मानवी भावविश्व उलगडणारी कथा. एखाद्या घटनेचा साक्षीदार राहणे आणि मदतीसाठी पुढे सरसावणे यांमधील निवडीबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्यांवर विचार करायला भाग पाडणारा कंटेन्ट. विनाशकारी भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भावनिक कथनशैली आणि तीव्र मानवी नाट्याचा प्रभावी मिलाफ. महत्त्वाकांक्षा, नैतिकता, मूल्ये आणि व्यावसायिक जबाबदारी यांचा अत्यंत वैयक्तिक पातळीवर वेध घेणारी कथा आहे. 

आली रे आली मराठी सिनेमाची वेळ आली! Ghabadkund सिनेमाचा दुसरा आठवडा, कमाई जाणून व्हाल अवाक

दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांचा व्ह्यू काय आहे?

विक्रम पटवर्धनने या चित्रपटाबाबत सांगितले की, “‘फ्रेम’ हा केवळ कॅमेऱ्याच्या नजरेतून नव्हे, तर माणुसकीच्या दृष्टीकोनातूनही जगाकडे पाहण्याचा प्रयत्न आहे. चंदू आणि सिद्धार्थ यांच्यातील नात्याच्या माध्यमातून कथाकथन आणि जगण्याकडे पाहण्याच्या दोन वेगळ्या दृष्टिकोनांचा शोध घेण्याची संधी आम्हाला मिळाली. आयुष्यातील अनिश्चितता आणि अनपेक्षित वळणांचाही हा चित्रपट वेध घेतो. अशा परिस्थितीत व्यावसायिक जबाबदारी आणि माणुसकी यांच्यातील धूसर होत जाणाऱ्या सीमारेषेवर व्यक्तिरेखा उभ्या राहतात, जिथे कर्तव्य आणि करुणा यांपैकी एकाची निवड करणे हेच सर्वांत मोठे आव्हान असते.”

नागराज मंजुळे झाले व्यक्त  

चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणाले की, “चंदू ही पारंपरिक नायकाची व्यक्तिरेखा नाही. त्यामुळे त्याची भूमिका साकारणे माझ्यासाठी तितकेच रंजक आणि आव्हानात्मक होते. तो आपल्या कामाप्रती अत्यंत समर्पित आहे, तडजोड न करणारा आहे आणि वास्तवाचे दस्तावेजीकरण करणे हेच आपले काम आहे, त्यात हस्तक्षेप करणे नव्हे, असा त्याचा ठाम विश्वास आहे. मात्र चित्रपटभर त्याच्या या धारणांची कसोटी लागते. त्याच्या भूमिकेशी सहमत व्हावे की नाही, याबाबत प्रेक्षकही स्वतःलाच प्रश्न विचारू लागतील.”

अमेय वाघ काय म्हणाला

सिद्धार्थची भूमिका साकारणारा अभिनेता अमेय वाघ म्हणाला “सिद्धार्थ ही संवेदनशीलता, आदर्शवाद आणि आव्हानात्मक क्षेत्रात पाऊल ठेवताना अनेक तरुण व्यावसायिकांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा आहे. ‘फ्रेम’मधील त्याचा प्रवास म्हणजे महत्त्वाकांक्षा आणि जबाबदारी यांच्यामध्ये संवेदनशीलतेला नेमके कुठे स्थान द्यायचे, याचा शोध आहे. त्याचा संघर्ष आणि त्याच्यासमोर उभे राहणारे निर्णय प्रेक्षकांना नक्कीच भावतील, असा मला विश्वास आहे.”

Web Title: Amey wagh nagaraj manjule zee5 marathi original movie frame premier on 10th july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:01 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • Entertainment News
  • marathi movie
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज
1

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज
2

Aadi Anant Marathi Movie: नात्यांच्या भावविश्वाची हसत-खेळत उलगडणार गोष्ट; अशोक सराफ-संकर्षण कऱ्हाडेंच्या सिनेमाचं पोस्टर रिलीज

Sahal Marathi Movie:  शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित
3

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली
4

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.