Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘सखे गं साजणी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज; कलाकारांची नावं अद्याप गुलदस्त्यात, नक्की आहे तरी कोण?

प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकरच्या रेडबल्बस्टुडिओ प्रस्तुत 'सखे गं साजणी' चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज झाले आहे. या चित्रपटामधील कलाकारांची नावे अद्यापही समोर आलेले नसून, जाणून घेऊयात हे नक्की कोण आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 07, 2025 | 12:49 PM
फोटो सौजन्य - इन्टाग्राम

फोटो सौजन्य - इन्टाग्राम

Follow Us
Close
Follow Us:

सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगलीय ती म्हणजे ‘सखे गं साजनी’ या नव्या चित्रपटाच्या पोस्टरची. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि निर्माते, दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या ‘रेडबल्ब प्रॉडक्शन’ हाऊस मार्फत हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने यापूर्वी या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने त्यांच्या ‘रेडबल्ब प्रॉडक्शन’ हाऊसचा नवा चित्रपट येणार असल्याचे देखील तिने चाहत्यांना सांगितले.

तसेच, आता अभिनेत्रीने चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर शेअर करत चित्रपटाची अधिकची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. समोर आलेल्या पोस्टरवरील पाठमोऱ्या उभ्या असलेल्या कलाकारांनी अर्थातच चित्रपटाची उत्सुकता वाढविली आहे. नेमका हा चित्रपट काय आहे, यांत कोण असणार आहे हे समोर आलेल्या पोस्टरवरून स्पष्ट होत नाही त्यामुळे साऱ्या प्रेक्षकांमध्ये एकूणच याची उत्सुकता रंगली आहे.

Rishab Shetty: क्लॅप बॉयपासून ते अभिनेता-दिग्दर्शकापर्यंत अनोखा प्रवास; ‘कांतारा’ने दिली प्रसिद्धी, आता टॉलिवूड इंडस्ट्रीत वर्चस्व

 

या समोर आलेल्या ‘सखे गं साजणी’ चित्रपटाच्या पोस्टरने खरंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढविली आहे. समुद्र किनारी हे तीन मित्र म्हणजेच दोन मुली आणि एक मुलगा पाठमोरे उभे असून त्यांनी हाताने हार्ट ईमोजी केलेला पोस्टरमध्ये दिसत आहे. चित्रपटातील हे तीनही कलाकार पाठमोरे असल्याने त्यांचे चेहरे दिसत नसल्याने चित्रपटात नेमकं कोण दिसणार आहे याची उत्सुकता चाहत्यांना लागून राहिली आहे. अर्थात या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे अस्पष्ट आहे. शिवाय कथा नेमकी काय असणार हे देखील गुलदस्त्यात आहे. दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित हा ‘सखे गं साजणी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ऋषभ शेट्टीने स्वतःच्या वाढदिवशी दाखवली Kantara: Chapter 1 ची पहिली झलक, कधी होणार चित्रपट रिलीज?

‘रेडब्लब स्टुडिओ’ प्रस्तुत, दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘सखे गं साजणी’ हा नवाकोरा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा अभिषेक जावकर, आदित्य वासुदेव घरत यांनी सांभाळली आहे. प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकर या सिनेविश्वातील लोकप्रिय जोडीच्या प्रॉडक्शन हाऊसतर्फे हा नवाकोरा सिनेमा रसिकांच्या भेटीस येत आहे. तर सहनिर्माते म्हणून अभिजीत खांडकेकर आणि अभिषेक दिलीप वाकचौरे यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटाच्या संगीताची धुरा संगीतकार विजय भटे यांनी सांभाळली आहे. आता समोर आलेल्या या पोस्टरवरून चित्रपटात कोणते कलाकार दिसणार?, चित्रपटाची कथा नेमकी काय असणार याची उत्सुकता आहे आणि लवकरच या उत्सुकतेला पूर्णविरामही मिळणार आहे.

Web Title: Prarthana behere come back with new movie sakhe ga sajani poster viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

अरेsss ही शान कोणाची लालबागच्या राजाची! राजाच्या दरबारात राहुल वैद्य पहिल्यांदाच सादर करणार Live परफॉर्मन्स
1

अरेsss ही शान कोणाची लालबागच्या राजाची! राजाच्या दरबारात राहुल वैद्य पहिल्यांदाच सादर करणार Live परफॉर्मन्स

The Bengal Files: ‘काश्मीरमध्येही कधी असं घडलं नाही…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या विरोधावर पल्लवी जोशीचा संताप
2

The Bengal Files: ‘काश्मीरमध्येही कधी असं घडलं नाही…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या विरोधावर पल्लवी जोशीचा संताप

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने केली फसवणूक! दोन्ही स्टार्सच्या विरोधात FIR दाखल, नक्की काय प्रकरण?
3

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणने केली फसवणूक! दोन्ही स्टार्सच्या विरोधात FIR दाखल, नक्की काय प्रकरण?

प्रसाद ओक देणार मनोरंजनाचा तडका, ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी
4

प्रसाद ओक देणार मनोरंजनाचा तडका, ‘वडापाव’मध्ये दिसणार गोड कुटुंबाची तिखट लव्हस्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.