
बाबांबद्दल बोलत असताना तिने अशोक सराफ ,निवेदिता सराफ आणि तिच्या नात्याबाबत देखील खुलासा केला. सायली म्हणते की, माझ्या बाबाची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण माझ्या आयुष्यात असे काही वडिलधारी व्यक्ती आहेत जे मला माझ्या बाबाची उणीव भासू देत नाही. त्या व्यक्तींपैकी एक म्हणजे अशोक सराफ. कॅमेऱ्यासमोर मुलाखत देताना मी त्यांना अशोक सर म्हणते पण वैयक्तिक आयुष्यात मी त्यांना पप्पा अशीच हाक मारते. आमच्यात खूप छान गप्पा रंगतात.
मी जेवढं माझ्य़ा बाबांना घाबरत नव्हते तेवढं मी अशोक सरांना घाबरते. ते मला कायमच काळजीने दटावतात. तू किती बाहेर फिरते, ऐकत नाहीस तू आणि निवेदिता अगदी सारख्याच आहात. ती सुद्धा काहीच ऐकत नाही. मग त्यावर मी असं म्हणते की, तुम्ही माझ्या वयात असताना ही असंच केलंत ना पप्पा. सगळेच तसं वागतात, असा गमतीशीर किस्सा सायलीने सांगितला. यापुढे देखील सायली म्हणते की, मी स्वत:ला खूप नशिबवान समजते की, अशी काळजी करणारे काळजी घेणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत.
अभिनेत्री सायली संजीवच्या कामाबद्दल सांगायचं झालंच तर ‘काहे दिया परदेस’ मधून नावारुपाला आलेली सायली ‘गोष्ट एका पैठणीची’ आणि ‘झिम्मा’ सिनेमातून साकारलेल्या वेगळ्या भूमिकातून प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.