समर स्वानंदीचं नातं कसं बहरणार
‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्ये स्वानंदी–समरचा नवा संघर्ष! रोहन-अधिराच्या नात्याचं काय होणार
समर-स्वानंदीचं नातं सुधारणार
याचदरम्यान, समरच्या सतत नाक बंद राहण्याच्या त्रासामुळे आणि औषधांमुळे स्वानंदीने त्याच्या आरोग्याकडे पाहून त्याला योग आणि प्राणायाम शिकवण्याचा निर्णय घेतलाय. तिच्या मार्गदर्शनामुळे समरला शारीरिक व मानसिक आरामाची नव्याने ओळख होते यामुळे दोघांमधील संबंध अधिक दृढ होताना दिसणार आहेत.
अधिराला आला थकवा
दुसरीकडे, अधिराला सततच्या कौटुंबिक दडपणामुळे मानसिक थकवा जाणवत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिने डंबेल्स आणि मोठा स्पीकर अशा जिम साधनांची व्यवस्था करून घरातच जोरदार झुम्बा सुरू करायचा निर्णय घेतलाय. या मोठ्या आवाजामुळे घरातील मोठ्यांना तसेच शेजाऱ्यांना त्रास होऊ लागतो. शेवटी, शेजारी वर येऊन आवाजाबाबत नाराजी व्यक्त करतात आणि अधिरावर समाजातील शांतता भंग केल्याचा आरोप करतात. या संपूर्ण घटनेने कुटुंबातील बदलते समीकरण आणि प्रत्येकाच्या संघर्षांचे नवे पैलू समोर येतात.
आता पुढे अधिरा आणि स्वानंदीच्या नव्या आयुष्यात काय बदल बघायला मिळणार? अधिरा मध्यमवर्गीय घरात कशी रुळणार आणि आपल्या सवयी बदलणार का? समर आपल्या तब्बेतीकडे लक्ष देणार का? स्वानंदीसह त्याची वागणूक बदलणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच पडले असतील आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी ही मालिका पहावी लागणार आहे.
सहज अभिनय
या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारे सुबोध भावे, तेजश्री प्रधान आणि अन्य सहकलाकार यांनी आपल्या सहज अभिनयाने सर्व प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. स्वानंदी आणि समरची भूमिका साकार करणाऱ्या तेजश्री आणि सुबोधची केमिस्ट्री कमाल असून प्रेक्षकांना फारच आवडत आहे. या मालिकेतील सतत येणारे ट्विस्ट आणि टर्न, गांभीर्य, मस्करी आणि सहजता याचा उत्तम मेळ ही मालिका असल्याचे दिसून येत आहे.






