केदारला त्याच्य़ा वडिलांचा चेहरा माहित नसला तरी, वडिलांच्या हातातल्या अंगठीवरुन तो आपल्या वडिलांच्या शोधात असतो. कधी ना कधी त्य़ाला त्याचे वडिल भेटतील आणि त्याचा शोध पूर्ण होईल अशी खात्री केदारला असते आणि आता हा शोध जरी पूर्ण झाला असला तरी, आता जे सत्य केदार समोर आलं आहे त्यामुळे केदारच्या आयुष्यात आता नवं वळण आलं आहे.
एकीकडे युवराजचे वडिल दयानंद खांडेकर यांना केदार आपलाच मुलगा असल्याचं सत्य लपवून ठेवणं दिवसेंदिवस जड जातं. कित्येक वर्ष लपवून ठेवलेलं हे सत्य केदारला सांगण्याचा निर्धार दयानंद खांडेकर करतात. मात्र घडतं काहीचरी वेगळंच. केदारला दयानंद खांडेकर हे सत्य ज्या दिवशी सांगणार त्याचवेळी केदारला ते आधीच कळतं. याबाबतचा प्रोमो झी मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्य़ात आला आहे.
काय आहे प्रोमोमध्य़े ?
तारिणी आणि संपूर्ण टीम गुंडांचा पाठलाग करत असतात त्यावेळी तारिणी त्या गुंडाला पिस्तुल खाली करण्यास सांगितलं. त्याचवेळी तारिणी केदारवर प्रचंड चिडलेली असते. कारण त्या गुडांच्या ताब्यात टीमचा कमांडर असतो. तारिणी केदारला खूप ओरडते. ती केदारला म्हणते की, तुझ्या चुकीमुळे आज कमांडरचा जीव धोक्यात होता. केदारच्य़ा मनात त्यावेळी अनेक प्रश्न उभे राहिलेले असतात. केदार तारिणीला म्हणतो की, आजपर्यंत मी माझ्या वडिलांचा शोध घेत होतो ती व्यक्ती दयानंद खांडेकर आहे. तारिणीला हे सांगताना केदार खूप रागात असतो. त्याचा रागावर संयम राहत नाही. तारिणीला मिठी मारत केदार खूप रडतो. मालिकेचा हा भाग येत्या 5 डिसेंबरला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
केदार त्याच्या वडिलांना स्विकारणार का ? खांडेकरांच्या कुटुंबात केदार राहायला जाईल का ? केदार आता पुढे काय निर्णय घेणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या येणाऱ्या भागात समोर येणार आहेत.
Ans: दयानंद खांडेकर आणि केदारची अनोखी मैत्री मालिकेत दाखवली आहे. खांडेकर हे सत्य सांगण्याचा निर्णय घेत असतानाच केदारला एका अनपेक्षित क्षणी ते आधीच समजतं. यामुळे त्याच्यासमोर भावनिक वादळ उभं राहतं.
Ans: हे अद्याप स्पष्ट नाही. केदारच्या भावना, राग, भूतकाळातील दुःख—या सर्वांचा त्याच्या निर्णयावर परिणाम होणार आहे. येणारे भाग याबाबतचा पुढचा टप्पा उलगडतील.
Ans: टीम गुंडांचा पाठलाग करत असताना तारिणी केदारवर चिडते. त्याच भावनिक क्षणी केदार तारिणीला सांगतो की त्याच्या वडिलांचा शोध अखेर संपला आहे.






