Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हास्याचा जबरदस्त डोस! स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडेची महाराष्ट्र टूर; प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज

स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे लवकरच महाराष्ट्र टूर करणार असून राज्यातील विविध शहरांमध्ये ते आपल्या लाईव्ह स्टँडअप कॉमेडी शोद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 11, 2026 | 12:47 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

दोन तास एकट्याने स्टेजवर उभं राहून प्रेक्षकांना सतत हसवत ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. मात्र अलीकडच्या काळात स्टँडअप कॉमेडीचा ट्रेंड वाढताना दिसत असून अनेक कॉमेडियन या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहेत. स्वतंत्र लाईव्ह शो असोत किंवा एखाद्या टीव्ही चॅनलवरील ‘हास्यजत्रा’सारखे कार्यक्रम असोत, प्रेक्षकांना हसवण्याची ही कला अत्यंत मेहनत आणि कौशल्याची मागणी करते.

याच क्षेत्रात सध्या वेगाने लोकप्रिय होत असलेलं नाव म्हणजे स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे. आपल्या खास शैलीत, दैनंदिन आयुष्यातील अनुभवांवर आधारित विनोद आणि भन्नाट टायमिंगच्या जोरावर मंदार भिडे प्रेक्षकांना खळखळून हसवतात.

त्यांचा विनोदच अचूक टाईम आणि अगदी लहानग्या पासून आजी आजोबांना खळखळून हसवून त्यांच मनोरंजन करणं हे मंदारला उत्तम जमत यात शंका नाही. कॉर्पोरेट मधली बड्या पगाराची नोकरी सोडून पूर्ण वेळ स्टँडअप करणं हा निर्णय त्यांनी काही वर्षा आधी घेतला आणि आता हे संपूर्ण महाराष्ट्राच मनोरंजन करण्यासाठी सज्ज होत आहे.

महाराष्ट्र टूर बद्दल बोलताना मंदार सांगतो ” आजवर अनेक ठिकाणी परफॉर्म केलं पण आपल्या महाराष्ट्रात विविध शहरात जाऊन तिथल्या प्रेक्षकांना भेटणं हा अनुभव नक्कीच वेगळा असणार आहे. दर बारा कोसावर बदलणारी भाषा आपल्या महाराष्ट्रात असल्याने तिथे जाऊन प्रेक्षकांच स्टँड अप च्या माध्यमातून मनोरंजन करणं हे तितकच आव्हानात्मक देखील आहे. माझा शो हा क्लीन कॉमेडी असल्याने अगदी तुम्ही तुमचा आई बाबा / आजी आजोबां सोबत येऊन स्टँड अप बघावं असा आहे यातून आपल्या पेक्षा मोठा लोकांना हा स्टँड अप फॉरमॅट ओळखीचा व्हावा हा देखील या मागचा उद्देश आहे”

स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडे लवकरच महाराष्ट्र टूर करणार असून राज्यातील विविध शहरांमध्ये ते आपल्या लाईव्ह स्टँडअप कॉमेडी शोद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. प्रत्येक शहरात जाऊन प्रेक्षकांशी थेट संवाद साधत हास्याचा जल्लोष रंगवण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे.

मात्र ही महाराष्ट्र टूर नेमकी कधी सुरू होणार आणि कोणत्या शहरांमध्ये शो होणार याबाबतची अधिकृत माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. तरीही या टूरची चर्चा चाहत्यांमध्ये आधीपासूनच रंगू लागली आहे.

‘धुरंधर’ आणि ‘टॉक्सिक’च्या भीतीने ‘डकैत’ची रिलीज डेट ढकलली पुढे; आदिवी आणि मृणालचा चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

मंदार भिडे यांचे चाहते केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात असल्याचे मानले जाते. त्यांच्या खास विनोदी शैलीमुळे आणि दैनंदिन आयुष्यातील अनुभवांवर आधारित भन्नाट निरीक्षणांमुळे प्रेक्षकांना त्यांच्या शोमध्ये हास्याचा अक्षरशः धबधबा अनुभवायला मिळतो.

कोकणापासून ते पुणे आणि नाशिकसारख्या शहरांपर्यंत विविध ठिकाणी त्यांचे शो होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता चाहत्यांमध्येही त्यांच्या महाराष्ट्र टूरबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दिव्या अग्रवालचे प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांवर गंभीर आरोप; अभिनेत्याने ‘फुटेजसाठी काहीही कर’ म्हणत दिलं प्रत्युत्तर

Web Title: Stand up comedian mandar bhide will soon embark on a maharashtra tour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Entertainment marathi
  • Standup comedian

संबंधित बातम्या

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ
1

Mohini marathi Serial: RK-मोहिनीच्या प्रेमकहाणीत नवा ट्विस्ट; रिसेप्शनमध्ये दीपाची एन्ट्री, पुराव्यांवरून होणार गोंधळ

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!
2

Amar Prem Katha Marathi Movie: प्रेमाची गोष्ट की भुताची कहाणी? ‘अमर प्रेम कथा’चं पहिलं पोस्टर आऊट; पोस्टरनेच वाढवली उत्सुकता!

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड
3

Sayani Gupta: सायानी गुप्ताच्या ‘आसमानी’ची जगभरात भरारी; दोन महिन्यांत १० फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!
4

Manjar Marathi Movie: चार मित्र, भन्नाट किस्से अन् वाढता गोंधळ; ‘मांजर’च्या टीझरने वाढवलं नावामागचं गूढ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.