Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सुपर डुपर’मधील ‘अंगाई’ गाण्याने जिंकले मन; Swanand Kirkire यांच्या आवाजाने भावूक झाले प्रेक्षक

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये जबरदस्त चित्रपट रिलीज होत असून, ते बॉक्स ऑफिसवर कल्ला करताना दिसत आहेत. अशातच आणखी एक मराठी चित्रपट ‘सुपर डुपर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 07, 2026 | 08:22 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘सुपर डुपर’मधील ‘अंगाई’ने जिंकले मन
  • स्वानंद किरकिरे यांच्या आवाजाचे झाले चाहते
  • ‘अंगाई’ ऐकून भावूक झाले प्रेक्षक
 

झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ हा मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, त्याच्या कथेसोबतच गाण्यांनाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील ‘अंगाई’ हे नव्याने प्रदर्शित झालेले गाणे विशेष चर्चेत असून, मराठी चित्रपटसृष्टीत अनेक वर्षांनंतर एक हळवे, मनाला भिडणारे अंगाई गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

‘निजूनी गेला दिस कधीचा.. चांद हा येता.. पापण काठी तरली नीज.. थांबव चाळा.. ममता ओली, कुस उतावीळ.. नीज रे बाळा..’ अशा भावपूर्ण ओळींनी सजलेले हे गाणे सध्या सर्वत्र गाजत आहे. या गाण्यामुळे चित्रपटगृहात एक भावनिक वातावरण निर्माण होत असून, अनेक प्रेक्षक या गाण्यादरम्यान भारावून जात आहेत. आणि हे गाणं प्रेक्षकांना पसंत देखील पडले आहे.

‘बम ल्यारी में फूटा…’, Zakir Khan चा इंडस्ट्रीवर थेट टोला; धुरंधरचे यश पचवता येणार नाही

या गाण्याला प्रसिद्ध गायक स्वानंद किरकिरे यांच्या भावस्पर्शी आवाजाची जोड लाभली आहे, ज्यामुळे गाण्याचा परिणाम अधिकच प्रभावी झाला आहे. कुणाल-करण यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला त्यांनीच संगीत दिले असून, आईच्या मायेचा, नात्यांतील जिव्हाळ्याचा आणि प्रेमाच्या कोमल भावनांचा सुंदर आविष्कार यातून साकारला आहे.

चित्रपटातील शशांक शेंडे यांच्या प्रभावी अभिनयामुळे कथेला अधिक बळ मिळाले आहे. विशेषतः ‘अंगाई’ गाण्याच्या प्रसंगात अनेक प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू पाहायला मिळत आहे, ज्यामुळे या गाण्याचा भावनिक प्रभाव स्पष्ट होत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी या गाण्याबद्दल बोलताना सांगितले की, “हे अंगाई गीत माझ्यासाठी अत्यंत खास आहे. लहानपणी ऐकलेल्या अंगाई गीतांच्या आठवणी, आईची माया आणि त्या काळातील निरागसता पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न या गाण्यातून केला आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात हरवलेली नात्यांची ऊब प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती.”

‘बॉर्डर 2 नंतर सिनेमागृहात पुन्हा एकदा धमाका करायला Sunny Deol सज्ज, नव्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट

झी स्टुडिओज सोबत नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ या चित्रपटात निर्मिती सावंत, ललित प्रभाकर, विदुला चौगुले, हृषीकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोटे यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत. एकंदरीत, ‘सुपर डुपर’मधील ‘अंगाई’ हे गाणे केवळ एक संगीत अनुभव नसून, प्रत्येकाच्या मनातील आईच्या आठवणींना उजाळा देणारा भावनिक प्रवास ठरत आहे.

Web Title: Super duper angai song marathi movie swanand kirkire emotional track

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:22 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sahal Marathi Movie:  शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित
1

Sahal Marathi Movie: शाळेची सहल, गणपतीपुळे अन् विद्यार्थ्यांची धमाल; ‘सहल’चा ट्रेलर प्रदर्शित

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?
2

Drishyam 3 Review: पोलिसांनी पुन्हा रचलं जाळं, पुराव्यांमध्ये अडकला विजय; सस्पेन्स दमदार पण नवीन काहीच नाही?

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर
3

Janhavi Killekar: ‘ऐपत नसतानाही लाखो रुपये मोजले’; बिस्लरीच्या पाण्यावरून ट्रोलिंग, जान्हवीने स्किनचे फोटो पोस्ट करत दिले उत्तर

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली
4

Hruta Durgule: ‘गरोदर राहिले, बाळ झाल्यावरही टीका होईल’; लग्न आणि वजन वाढीच्या ट्रोलिंगवर हृता दुर्गुळे स्पष्टच बोलली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.