Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; महापालिकेकडे धोकादायक झाडांची नोंदच नाही

मुंबईतील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनांनंतर राज्यभरातील धोकादायक झाडांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच चंद्रपूर महापालिकेकडे शहरातील धोकादायक झाडांची कोणतीही अधिकृत यादी किंवा डिजिटल नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2026 | 02:38 PM
Chandrapur News: चंद्रपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; महापालिकेकडे धोकादायक झाडांची नोंदच नाही

Chandrapur News: चंद्रपूरकरांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; महापालिकेकडे धोकादायक झाडांची नोंदच नाही

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूर महापालिकेकडे शहरातील धोकादायक झाडांची स्वतंत्र यादी किंवा सर्वेक्षण अहवाल उपलब्ध नसल्याचे उघड झाले आहे.
  • धोकादायक झाडांवर कारवाई केवळ नागरिकांच्या तक्रारीनंतरच केली जात असल्याने प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
  • पावसाळ्यापूर्वी झाडांचे सर्वेक्षण, जीआयएस मॅपिंग आणि जोखीम वर्गीकरण तातडीने करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंबईत अलीकडेच मुसळधार पावसादरम्यान झाडे कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरातील शहरांमध्ये धोकादायक झाडांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातील धोकादायक झाडांची स्थिती जाणून घेण्यासाठी मागविण्यात आलेल्या माहितीत धक्कादायक बाब समोर आली. चंद्रपूर महानगरपालिकेकडे शहरातील धोकादायक झाडांची कोणतीही स्वतंत्र यादी, सर्वेक्षण अहवाल किंवा डिजीटल नोंद उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक असलेले पूर्वनियोजन आणि प्रतिबंधात्मक उपाय कितपत प्रभावी आहेत? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Mira Bhayandar News: मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती; पर्यटनस्थळे बंद, आदेश मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांकडून धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतरच संबंधित जागेची पाहणी केली जाते. त्यानंतर महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५ अंतर्गत वृक्षप्राधिकरण समितीची परवानगी घेऊन पुढील कारवाई केली जाते. मात्र शहरात एकूण किती धोकादायक झाडे आहेत? ती कोणत्या भागात आहेत किंवा त्यांचा धोका किती आहे? याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील जुन्या, वयोवृद्ध, आतून पोकळ झालेल्या किंवा वीजवाहिन्यांच्या संपर्कात आलेल्या झाडांचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्यात येते का? याबाबतही कोणतीही स्पष्ट माहिती महापालिकेकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होते का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

महापालिकेच्या हद्दीतील झाडांच्या फांद्या नियमित छाटल्या जात असल्याचा दावा प्रशासनाने केला. तसेच रस्त्यालगत धोकादायक अवस्थेतील वाढलेली झाडेही तोडण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांकडून अशा झाडांची माहिती मिळाल्यानंतर त्यावर नियमानुसार कार्यवाही केली जाते, असेही प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र नागरिकांच्या तक्रारीवर अवलंबून असलेली ही व्यवस्था पुरेशी नसल्याचे मत पर्यावरणप्रेमी आणि नागरिक व्यक्त करत आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील

मॅपिंगची आवश्यकता

राज्यातील अनेक महापालिकांनी धोकादायक झाडांचे जीआयएस आधारित मॅपिंग, क्रमांक देऊन नोंदणी आणि नियमित आरोग्य तपासणीची प्रणाली विकसित केली. मात्र चंद्रपूरमध्ये अशा प्रकारची कोणतीही यंत्रणा अद्याप अस्तित्वात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करणेही प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरू शकते. नागरिकांनीही धोकादायक झाडे, तुटलेल्या फांद्या किंवा झुकलेल्या वृक्षांची माहिती तातडीने महापालिकेला देण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर महापालिकेने शहरातील सर्व धोकादायक झाडांचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांची यादी तयार करावी, जोखीम पातळीनुसार वर्गीकरण करावे आणि पावसाळा जोर धरण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

पहिल्याच पावसात बसला फटका

यंदाच्या पावसाळ्यात व्याहाडी पेट्रोल पंप परिसर, ताडोबा रोड, तुकूम तसेच शहरातील इतर काही भागात मोठी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी एका घटनेत उभी असलेल्या कारचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा घटना भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतात, अशी भीती व्यक्त होत आहे. शहरातील अनेक मुख्य रस्ते, शासकीय कार्यालये, शाळा, रुग्णालये, उद्याने आणि निवासी वस्त्यांमध्ये अनेक दशकांपूर्वीची मोठी झाडे आहेत. त्यापैकी काही झाडे वयोमानामुळे कमकुवत झाली असून, मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ती कोसळण्याचा धोका वाढतो.

Web Title: Chandrapur civic body has no list of dangerous trees safety concerns rise ahead of monsoon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’
1

Sangli Plot Scam : सांगली महापालिकेत भूखंड घोटाळ्याचा आरोप; ‘आठ दिवसांत परत घ्या, अन्यथा आंदोलन’

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे
2

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी
3

भिंतीचं प्लास्टर आणि पेंट निघतंय? एका सोप्या उपायाने भिंत करा पुन्हा नव्यासारखी

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे
4

Pelvic Floor Exercises: प्रसूतीपूर्वीच लक्ष द्या! पेल्विक फ्लोर व्यायामाचे प्रसूतीनंतरही मिळतात ‘हे’ फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.