Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Bhayandar News: मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती; पर्यटनस्थळे बंद, आदेश मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई

मिरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने सर्व प्रमुख समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 07, 2026 | 01:04 PM
Mira Bhayandar News: मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती; पर्यटनस्थळे बंद, आदेश मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई

Mira Bhayandar News: मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमध्ये पूरसदृश परिस्थिती; पर्यटनस्थळे बंद, आदेश मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे मिरा-भाईंदरमधील सर्व प्रमुख समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहेत.
  • बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि BNS अंतर्गत कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
  • उत्तन, गोराई, वेलंकणी आणि धारावी मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करून पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सतत कोसळणारा पाऊस, सोसाट्याचा वारा आणि समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर पोलीस प्रशासनाने शहरातील सर्व प्रमुख समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Maratha Reservation: सातारा गॅझेटियर लागू करा, सरकारने फसवणूक थांबवावी; पाटण मराठा सेवकांचा एल्गार

शहरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. जोरदार वाऱ्यामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून वीजपुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेलाही फटका बसला आहे. हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा तसेच काही खासगी कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

दरम्यान, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अनेक नागरिक आणि पर्यटक उत्तन, गोराई, वेलंकणी, धारावी मंदिर परिसर तसेच इतर समुद्रकिनारी पर्यटनस्थळांकडे मोठ्या प्रमाणावर जात असल्याचे पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आले. समुद्रात भरतीच्या वेळी साडेचार फूटांपर्यंत उंच लाटा उसळत असल्याने या ठिकाणी कोणत्याही क्षणी दुर्घटना घडू शकते. याशिवाय मुसळधार पावसामुळे डोंगराळ आणि जंगल परिसरात दरडी कोसळणे, झाडे पडणे किंवा पाण्याचा वेग अचानक वाढण्याचा धोका देखील कायम आहे.

पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य राबविणे कठीण होऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने उत्तन समुद्रकिनारा, गोराई समुद्रकिनारा, वेलंकणी चर्च परिसर, धारावी मंदिर परिसर तसेच शहरातील इतर पर्यटनस्थळांवर प्रवेशबंदी लागू केली आहे.

या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी मिरा-भाईंदर पोलीसांनी शहरातील प्रमुख चौक, समुद्रकिनाऱ्यांकडे जाणारे मार्ग तसेच पर्यटनस्थळांच्या प्रवेशद्वारांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पर्यटकांना तेथे जाण्यापासून रोखले जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने घरी परतण्याचे आवाहन केले जात आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून वाहनांची तपासणीही केली जात आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार कारवाई केली जाईल. पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या, बंदी असतानाही समुद्रकिनाऱ्यावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा मद्यप्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींवरही कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील

दरम्यान, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस प्रशासन सतर्क असून शहरातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने जारी केलेल्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, समुद्रकिनारे, नाले आणि पाणी साचलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ पोलीस किंवा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेता पुढील काही दिवस नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असून सुरक्षिततेलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Mira bhayandar police close beaches amid heavy rain strict action warned against rule violators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:03 PM

Topics:  

  • Marathi News
  • mira bhayandar
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू
1

Russia-Ukraine :धक्कादायक ;युक्रेनवर रशियाचा मोठा मिसाईल-ड्रोन हल्ला ;२४ जणांचा मृत्यू

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव
2

World News:तेलाचा भाव १०० डॉलरपार,जगाला महागाईचा झटका; पेट्रोल-डिझेलपासून वाहतुकीपर्यंत वाढणार दबाव

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला
3

Taiwan-China : तैवानजवळ चीनची लष्करी हालचाल; १४ लढाऊ विमानांसह ८ जहाजांची घुसखोरी, तणाव वाढला

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार
4

West Bank News : ऑलिव्हच्या शेतात रक्तपात; वसाहतवाद्यांच्या हल्ल्यात पॅलेस्टिनी नागरिक ठार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.