Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ethanol Policy: सरकारचा मोठा यू-टर्न? भूमिकेत बदल होणार… पेट्रोलमध्ये 25% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय लांबणीवर?

: भारतात पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिश्रणाच्या E25 प्रस्तावित निर्णयाला वाहनधारक आणि ऑटोमोबाईल क्षेत्राकडून होणारा विरोध पाहता, सरकारने हा निर्णय तूर्तास पुढे ढकलण्याचे संकेत दिले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या E20 पेट्रोलच्या सर्व्हेमधील ग्राहकांच्या तीव्र नाराजीनंतर सरकारने हा पाऊल मागे घेतल्याची चर्चा आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 07, 2026 | 01:40 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सरकारचा मोठा यू-टर्न?
  • भूमिकेत बदल होणार…
  • 25% इथेनॉल मिश्रणाचा निर्णय लांबणीवर?
Ethanol Policy: वाहन मालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पेट्रोलमध्ये २५% इथेनॉल मिसळण्याचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशभरात E20 बाबत सुरू असलेल्या चर्चेच्या आणि वाहनधारकांकडून सुरु असलेला विरोध त्याचबरोबर ऑटोमोबाईल क्षेत्राकडून सुरु असलेल्या तक्रारी येतच होत्या. विविध व्हिडीओ व्हायरल होत होते. त्यामुळे, केंद्र सरकार सध्या E25, म्हणजेच २५% इथेनॉल असलेले पेट्रोल, लागू करण्याची घाई करत नसल्याचं समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, जनतेची चिंता आणि वाढता विरोध लक्षात घेता, सरकार हा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलू शकतं असं सांगण्यात येत आहे.

गुंतवणकूदारांनो लक्ष द्या! शेअर बाजारात धमाका होणार, येतोय IPO… US पासून London पर्यंत बैठका, ‘या’ दिवशी डेब्यू

हा निर्णय का पुढे ढकलला जाईल?

अलीकडच्या काळात, अनेक वाहन मालकांनी E20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होणे, वाहनांचे नुकसान होणे आणि जुन्या वाहनांवर परिणाम होण्याबद्दल तक्रार केली आहे. याच कारणामुळे, E25 लागू करण्यापूर्वी सरकारला आता अधिक तपास, तांत्रिक अभ्यास आणि चर्चा करायची आहे.

सध्याची परिस्थिती काय?

सध्या, E20 पेट्रोल देशभरात उपलब्ध आहे. या पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल आणि ८०% पेट्रोल असते. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, प्रदूषण कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी इथेनॉलच्या वापराला प्रोत्साहन देणे, हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

E25 लागू करण्यापूर्वी तयारी

इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, E25 लागू करण्यापूर्वी वाहन कंपन्या, तेल विपणन कंपन्या आणि इतर सर्व एजन्सींनी पूर्णपणे तयार असावे, अशी सरकारची इच्छा आहे. यासाठी वाहनांची पुनर्तपासणी आणि इंजिन कॅलिब्रेशनची आवश्यकता असणार आहे.

लोकांच्या तक्रारी का?

वाहन मालकांचे म्हणणे आहे की, काही वाहनांमध्ये E20 पेट्रोलमुळे इंधन कार्यक्षमता कमी झाली आहे. शिवाय, जुन्या वाहनांच्या इंजिन आणि इतर भागांचे नुकसान झाले आहे, ज्यामुळे यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण वाहन कंपन्या आणि सरकारचा दावा आहे की, E20 ची अंमलबजावणी व्यापक चाचण्यांनंतर करण्यात आली आहे आणि ते नवीन वाहनांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

सरकारला काय हवंय?

सरकारला भविष्यात इथेनॉल-मिश्रित पेट्रोलला अधिक प्रोत्साहन द्यायचे आहे, परंतु सध्या E25 लागू करण्याचा निर्णय घाईने घेतला जाणार नाही. प्रथम चाचण्या पूर्ण केल्या जातील आणि त्यानंतरच भविष्यातील धोरण ठरवले जाईल.

Todays Gold-Silver Price: खरेदीदारांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

Web Title: Government may delay 25 percent ethanol blending petrol marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 01:40 PM

Topics:  

  • Business News
  • Diesel Petrol Price
  • E20 Fuel
  • Ethanol Petrol
  • Marathi News
  • Petrol and diesel
  • Petrol Diesel Price Today
  • petrol pump

संबंधित बातम्या

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण
1

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल – डिझेलच्या किमतीचा उडणार भडका! काय आहे कारण

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज
2

Chandrapur News: चंद्रपुरातील ‘बोडी’ होतायत नामशेष! पारंपरिक जलसंधारण व्यवस्थेवर मोठं संकट ; पुनरुज्जीवनाची गरज

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं
3

Monika Dabade Mangalagauri Look: ‘ठरलं तर मग’ फेम मोनिका दबडेचा जांभळ्या नऊवारीत मराठमोळा अंदाज, चाहत्यांचं लक्ष वेधलं

HDFC Bank: एचडीएफसी बँकेचा मोठा कारनामा! जागतिक बाजारात डंका, $1.75 अरब गोळा करत मोडला 18 वर्षांचा रेकॉर्ड
4

HDFC Bank: एचडीएफसी बँकेचा मोठा कारनामा! जागतिक बाजारात डंका, $1.75 अरब गोळा करत मोडला 18 वर्षांचा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.