Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत ‘स्वामी गुरुमाऊली’ गाणं प्रदर्शित; अभिनेता सनी कांबळेचं दिग्दर्शनात पदार्पण

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधत “स्वामी गुरुमाऊली” हे गाण नुकतच प्रदर्शित केल आहे. अभिनेता सनी कांबळे याने या गाण्याचं दिग्दर्शन केल आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 20, 2026 | 01:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त ‘स्वामी गुरुमाऊली’ हे भक्तीमय गाणं नुकतंच प्रेक्षकांसमोर आले आहे. स्वामींचा महिमा अपरंपार असून त्यांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो.अभिनेता सनी कांबळे आणि तेजस पानसरे यांनी ‘टाइमलेस स्लेट्स’ नावाचं प्रोडक्शन हाऊस सुरू केलं आहे. या बॅनरअंतर्गत गाणी, शॉर्ट फिल्म्स, फीचर फिल्म्स आणि जाहिराती बनवण्याचा त्यांनी मानस दर्शवला आहे.‘स्वामी गुरुमाऊली’ हे गाणं या बॅनरखाली प्रदर्शित झालं असून, त्याचे दिग्दर्शन अभिनेता सनी कांबळे यांनी केले आहे. यापूर्वी त्यांनी ‘विशू’, ‘एका ब्रेकअपची गोष्ट’ यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

श्री स्वामी समर्थांचा संदेश आपल्या आत्मविश्वासाला अजून बळ देतो. या संदेशाला साकारत “स्वामी गुरुमाऊली” हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हृदयस्पर्शी, भावनिक आणि प्रेरणादायी या गाण्यात अभिनेता प्रियेश चव्हाण, रुहान गांगणे, साक्षी मोरे, पद्मश्री उपळे, अनिकेत ढोले, मानसी अडगळे, श्रीषा घुबडे, रोहन कुलकर्णी आणि सारिका देशमुख यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.गाणं ऋषभ साठे, शीतल गद्रे आणि बालगायक मल्हार यांनी गायले असून, संगीताची रचना प्रज्वल यादव यांनी केली आहे. गाण्याची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन सनी कांबळे यांनी केले आहे. तर निर्मिती तेजस पानसरे आणि सनी कांबळे यांनी केली असून, छायाचित्रण रोहित जेंकेवाड यांनी साकारले आहे.

अभिनेता सनी कांबळे यांनी गाण्याच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल सांगितलं की, “जेव्हा मी रेकॉर्ड लेबल सुरू करण्याचा विचार केला, तेव्हा सुरुवात स्वामींच्या गाण्यापासून करायचं ठरवलं. माझा मित्र तेजस पानसरे आणि मी या गाण्याची निर्मिती केली आहे. या चार महिन्यांच्या प्रवासात प्रितम कांबळे यांनी मनापासून काम करून साथ दिली; त्याशिवाय हे गाणं पूर्णत्वाला पोहचू शकत नव्हते.”संगीतकार प्रज्वल यादव आणि एडिटर विनय शिंदे यांनीही या गाण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. सनी कांबळे म्हणतात की, “माझ्या अपेक्षेपेक्षा सुंदर टीझर आणि गाणं तयार झालं. जेव्हा आम्ही टीझर एडिट करत होतो, तेव्हा त्यातील वाक्य खरोखरच खरी वाटत होती:‘आयुष्य जेव्हा आपल्याला गुडघ्यावर बसवत, तेव्हा तिथूनच उभं राहण्याची ताकद मिळते. राग मनात ठेवला की तो आपल्यालाच चारतो. पण श्रद्धा आणि संयम माणसाला नव्याने घडवतात. देवावर रुसण्यापेक्षा स्वतःकडे पाहिलं तर उत्तर सापडू शकतं. जगाला दोष देणं सोप्प असतं, पण प्रेमाने पाहिलं तर ते वेगळच दिसत. संकट येतात म्हणजे देव दूर गेला नाही; कदाचित तो आपल्याला मजबूत करत असतो.’ या टीझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून, भक्तीभाव आणि प्रेरणादायी संदेश यांचा संगम सर्वांना भावतो आहे.

Mamachya Govyala Jauya: विजू माने घेऊन येतायत मैत्री-मस्तीची धमाल गोवा ट्रिप; ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न

पुढे सनी गाण्याविषयी सांगतात. “हे गीत एका तरुणाच्या भावनिक प्रवासाची कथा सांगते. तो जीवनावर आणि स्वामींवर रागावतो, त्याच्या मनात श्रद्धेऐवजी प्रश्न निर्माण होतात. दुःख, राग आणि संभ्रम यांच्या प्रवासातून तो हळूहळू पुन्हा स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवू लागतो. ही कथा भक्ती, विश्वास आणि स्वामी समर्थांच्या कृपेची जाणीव करून देणारी आहे.गाण्याच्या माध्यमातून भक्तीभाव आणि आधुनिक सादरीकरण यांचा संगम प्रेक्षकांना दिसतो असून, याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Zee Natya Gaurav Puraskar 2026: “उत्सव रंगभूमीचा, सोहळा रंगकर्मींचा” दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

Web Title: Swami gurumauli song released on the occasion of shri swami samarth prakat din actor sunny kamble makes directorial debut

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi News
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
1

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
4

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.