Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुहूर्त ठरला! झी मराठीवर रंगणार महाराष्ट्राचा महाविवाह सोहळा, ‘वीण दोघातली ही तुटेना’चा डेस्टिनेशन वेडिंग जल्लोष

गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, आधिरा- रोहन आणि स्वानंदी- समर यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार असून महाराष्ट्राचा महाविवाह सोहळा पाहायला मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 29, 2025 | 01:12 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच एका भव्य ‘बीच वेडिंग’ चा सोहळा पाहायला मिळणार आहे. झी मराठीने आपल्या प्रेक्षकांसाठी नेहेमीच काहीतरी वेगळं आणि लक्षवेधी सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकत आली आहे, आणि यावेळी देखील पुन्हा एकदा हाच झी मराठीचा छोटा पडदा एका अविस्मरणीय सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे राजवाडे घराण्याच्या लग्नसोहळ्यासाठी! ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेतील हा विवाह सोहळा मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात नवा मानदंड निर्माण करणार आहे.

प्रेक्षकांच्या मनात घर करणारी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे. आधिरा आणि रोहन यांच्या लग्नासाठी समर आणि स्वानंदी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसणार आहेत. या लग्न मांडवात एक नाही तर दोन लग्न होणार आहेत आधिरा-रोहन आणि समर-स्वानंदी. या खास लग्न सोहळ्याचे चित्रीकरण करण्यासाठी मालिकेची संपूर्ण टीम गोव्याला दाखल झाली आहे, ज्यामुळे मालिकेच्या कथानकाला एक नवा रंग मिळाला आहे.

 

दक्षिण गोव्याच्या आलिशान फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार असून समुद्रकिनाऱ्याच्या मनोहारी वातावरणात ‘बीच वेडिंग’चा थाटमाट पाहायला मिळणार आहे. सजवलेला समुद्रकिनारा, सुंदर फुलांनी नटलेला मंडप आणि कलाकारांचे आकर्षक पोशाख हे या विशेष भागाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. २९ ऑक्टोबरपासून ते ११ नोव्हेंबरपर्यंत हा जल्लोष रंगणार असून, राजवाडे आणि सरपोतदार कुटुंब प्रत्येक दिवस एक नवा सोहळा घेऊन येणार आहेत. गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात, आधिरा- रोहन आणि स्वानंदी- समर यांच्या यांचं डेस्टिनेशन वेडिंग होणार आहे. मुहूर्तमेढ, मेहेंदी, चुडा, हळद, सीमांत पूजन आणि शेवटी अविस्मरणीय विवाहसोहळा हा प्रत्येक कार्यक्रम या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी 2’ लवकरच होणार बंद? स्मृती इराणीच्या मालिकेबाबत समोर आली मोठी बातमी

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे 
२९ ऑक्टोबर: मुहूर्तमेढ
३० आणि ३१ ऑक्टोबर: मेहेंदी
१ आणि २ नोव्हेंबर: चुडा
५ आणि ६ नोव्हेंबर: हळद
७ नोव्हेंबर: सीमांत पूजन
१० आणि ११ नोव्हेंबर: अविस्मरणीय विवाह सोहळा

परंपरा, संस्कृती आणि आधुनिकतेचा मिलाप असलेला हा विवाह सोहळा प्रेक्षकांसाठी एक खास अनुभव ठरणार आहे. महाराष्ट्राचा महाविवाह सोहळा रंगणार, तुम्हाला आशीर्वाद दयायला नक्की यावं लागणार!

Thamma Collection: ‘थामा’ने मंगळवारी बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, केला १०० कोटींचा गल्ला पार; मोडले हे रेकॉर्ड

Web Title: The engagement in veen doghatali hi tutena the grand wedding ceremony of the rajwade family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • zee marathi

संबंधित बातम्या

‘मेरे लाईफ मे हीरो की…’; ‘तुला पाहते रे’ अभिनेत्री Gayatri Datar चा साखरपुडा संपन्न, पहा Photos
1

‘मेरे लाईफ मे हीरो की…’; ‘तुला पाहते रे’ अभिनेत्री Gayatri Datar चा साखरपुडा संपन्न, पहा Photos

Kapil Sharmaची तिजोरी भरली, तर इतर स्टार्सच्या खिशात आले ऐवढे पैसे, चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल जाणून घ्या
2

Kapil Sharmaची तिजोरी भरली, तर इतर स्टार्सच्या खिशात आले ऐवढे पैसे, चित्रपटातील स्टार्सच्या फीबद्दल जाणून घ्या

‘बावरा मन’ वेब सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला, सनशाइन पिक्चर्स डिजिटलची दमदार सुरुवात!
3

‘बावरा मन’ वेब सिरीजचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला, सनशाइन पिक्चर्स डिजिटलची दमदार सुरुवात!

Smita Patil Death Anniversy : बोलके डोळे आणि सावळा रंग, स्मिता पाटील यांची आजही इतकी लोकप्रियता का ?
4

Smita Patil Death Anniversy : बोलके डोळे आणि सावळा रंग, स्मिता पाटील यांची आजही इतकी लोकप्रियता का ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.