Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी शाळांची आठवणी ताजे करणारं ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ मधील गाणं ‘शाळा मराठी’ प्रदर्शित!

मराठी शाळांची आठवणी जागे करणारे ‘शाळा मराठी’ हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ मधील पहिले जबरदस्त गाणे अखेर प्रदर्शित झाले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 04, 2025 | 02:16 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मराठी शाळांची आठवणी ताजे करणारं गाणं
  • ‘शाळा मराठी’ ‘क्रांतिज्योती विद्यालय’ चित्रपटामधील पहिलं गाणं
  • गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमेने मांडले मत
 

मराठी माध्यमातील शाळांची संस्कारमूल्ये, त्या शाळांनी घडवलेली पिढी आणि शिक्षकांनी दिलेला अमूल्य वारसा ही सगळी शाळेची माया पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटातील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाळा मराठी’ हे पाहिलं मराठी गाणं रिलीज झालं आहे. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी ‘क्रांतिज्योतीचे संगीत कारभारी’ असे म्हणत ‘द फोल्क आख्यान’ च्या हर्ष-विजय आणि ईश्वर सोबत पाच दमदार गाणी चाहत्यांच्या भेटीला येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यातील पहिले ‘शाळा मराठी’ हे शाळेची आठवण जागं करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

मराठी शाळेची ओळख, तिचे वातावरण, त्यातील आपुलकी, शिक्षकांचे प्रेम आणि शाळेच्या भिंतीतून मिळालेले संस्कार हे सर्वच या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून जिवंत होते. रोहित जाधव यांच्या दमदार आवाजास हर्ष–विजय यांचे संगीत आणि गीतकार ईश्वर अंधारे यांच्या मजेशीर शब्दांचा सुंदर मेळ यात अनुभवायला मिळतो आहे. हे गाणं प्रत्येकाला नॉस्टॅलजिक करणारे आहे.

Marathi Serial : अखेर वडिलांचं सत्य आलं समोर, केदारच्या आयुष्यात नवं वादळ; तारिणी मालिकेचा नवा प्रोमो

गाण्याबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, ”क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’मध्ये आम्ही मराठी माध्यमाच्या शाळांचे वास्तव, त्यांची जिद्द आणि त्यांच्यातील ऊर्जा पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शाळा मराठी’ हे गाणे या चित्रपटाच्या आत्म्याला स्पर्श करणारे आहे. मराठी शाळांनी अनेक पिढ्या घडवल्या त्यांचे संस्कार, मूल्य आणि ऊब या गीतात सजीव झाली आहे. १२ वर्षांच्या रोहित जाधवने या गाण्यात रंगत आणली आहे. रोहित हा छत्रपती संभाजीनगरचा असून गुरुवर्य अनाथाची माऊली रामेश्वरजी महाराज पवार यांच्या कीर्तन संस्थेत तो गेली सहा वर्षं शिक्षण घेत आहे. एका छोट्या गावचा चिमुकला किर्तनकार या गाण्यातून त्याची कला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असल्याचा मला फार आनंद आहे. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला हे माझे विनम्र अभिवादन आह.”

 

संगीतकार हर्ष–विजय म्हणाले, ” ‘शाळा मराठी’ हे गाणं करताना आम्हालाही पुन्हा एकदा आपल्या शाळेत गेल्यासारखे वाटले. मातृभाषेची आपुलकी, शिक्षकांचा स्पर्श आणि बालपणाची ऊर्जा आम्ही संगीतामध्ये जाणवून दिली आहे. हे गाणे ऐकताना प्रत्येकाला आपल्या शाळेच्या आठवणी ताज्या होतील आणि हीच आमची सर्वात मोठी कमाई आहे. आमचा हा पहिला चित्रपट आहे व या गाण्याचा प्रवास खूप अनोखा होता. हे गाणे करताना आम्ही सर्वांनीच खूप मजा केली. दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांचे आम्ही आभारी आहोत; त्यांनी आम्हाला ही संधी दिली.”

‘रातो की नींद हराम…’, राज निदिमोरू आणि समांथाच्या लग्नावर Ex पत्नी श्यामलीने आता सोडले मौन!

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’मध्ये दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर आणि पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करणारी प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट दिसणार आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, निर्मिती क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळीची, तर सहनिर्माते विराज गवस, उर्फी काझमी (क्रेझी फ्यू फिल्म्स) आणि अजिंक्य ढमाळ आहेत.

Web Title: The first song shaala marathi from the marathi film krantijyoti vidyalaya marathi madhyam released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • Marathi News

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.