Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘असा मी अशी मी’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित

असा मी अशी मी’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लंडनच्या मोहक लोकेशन्समध्ये घडणारी ही प्रेमकहाणी ग्लॅमर आणि भावनिक वळणांनी सजलेली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 25, 2025 | 02:19 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणारा अमोल शेटगे दिग्दर्शित, सचिन नाहर आणि अमोग मलाविया निर्मित ‘असा मी अशी मी’चा भव्य ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. लंडनच्या मोहक लोकेशन्समध्ये घडणारी ही प्रेमकहाणी ग्लॅमर आणि भावनिक वळणांनी सजलेली आहे. ‘असा मी अशी मी’ चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला असून या ट्रेलर ने एका प्रेमकथेला आंतरराष्ट्रीय उंची दिली आहे.

यूकेमधील भव्य लोकेशन्स, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, आलिशान प्रॉडक्शन व्हॅल्यू आणि मनाला भिडणारा रोमँस. या सर्वांचा मिलाफ असलेला हा चित्रपट निर्माता सचिन नाहर आणि अमोग मलाविया यांच्या मोठ्या दृष्टीकोनाची झलक दाखवतो.

या ट्रेलर मध्ये आपण पाहू शकतो अभिनेते अजिंक्य रमेश देव एक भारतीय फोटोग्राफरच्या भूमिकेत आहेत. देखणा, स्टायलिश आणि थोडासा कॅसानोव्हा स्वभावाचा. त्यांचं व्यक्तिमत्त्व एकदम मोकळं, धडाडीचं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेणारं दाखवलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री तेजश्री प्रधान एक परिपक्व, स्थिर आणि स्वतःच्या स्वप्नांनी भरलेली मुलगी म्हणून दिसते जी लंडनमध्ये स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी चालवते. लंडनच्या चमचमणाऱ्या लोकेशन्समुळे त्यांच्या प्रेमाची प्रत्येक फ्रेम अधिकच उठून दिसते. मराठी सिनेमात पहिल्यांदाच इतक्या ग्रँड स्केलवर चित्रिकरण झाले असून, रोल्स रॉयसची लक्झरी, प्रसिद्ध हेरिटेज लोकेशन असलेला हार्टलेबरी कॅसलचे राजेशाही वैभव आणि इतर अप्रतिम लोकेशन्समुळे प्रत्येक फ्रेमला भन्नाट आंतरराष्ट्रीय भव्यता लाभली आहे.

विशेष बाब म्हणजे चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला असून, ज्यूरी आणि प्रेक्षकांकडून त्याला विशेष दाद मिळाली.ट्रेलर मध्ये हि प्रेमकहाणी जिथे सुंदर उंची गाठते, तिथेच एक अनपेक्षित वळण दिसतं. तेजश्री अचानक अजिंक्यपासून दूर जाताना दिसते. या निर्णयामागचं कारण काय? हे रहस्यच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरतं.

अभिजीत सावंत आणि गौतमी पाटीलच्या AI व्हिडीओ ने वेधले लक्ष, चाहत्यांची वाढवली उत्सुकता

अमोल शेटगे दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य रमेश देव आणि तेजश्री प्रधान यांच्यासोबत अनेक भारतीय आणि ब्रिटिश कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. मुख्य कलाकारांसोबतच माधव देवचके, संजय मोने, कृष्णकांत जगन्नाथ केणी आणि यशश्री मसुरकर यांसारखे दमदार आणि अनुभवी मराठी कलाकारही चित्रपटात झळकणार आहेत. ही भव्य निर्मिती मॅक्समस लिमिटेड या प्रतिष्ठित बॅनर्स अंतर्गत साकारली आहे. सिनेमाचे निर्माते सचिन नाहर आणि अनिश शर्मा तसेच सह निर्माते अमोग मलाविया, सुरेश गोविंदराय पै हे आहेत. उप-निर्माता आशा नाहर, डी ओ पी सोपान पुरंदरे, तर निलेश मोहरीर ह्यांनी सिनेमाला संगीत दिलय.  तर हा चित्रपट २८ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: The grand trailer of aasa mi aashi mi has been released and the film was shot abroad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi movie

संबंधित बातम्या

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज;  ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
1

Tujhya Aaila Teaser: ‘शिवी नाय, खेळाचं नाव हाय ते!’ सुजय डहाके यांच्या ‘तुझ्या आयला’चा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी
2

Gondhal Movie: ‘गोंधळ’च्या स्क्रीनिंगला खऱ्या अर्थाने गोंधळ! ३०० सीट्स, ६५० हून अधिक प्रेक्षक; जागा न मिळाल्याने नाराजी

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..
3

Siddharth Jadhav Death Rumour: स्वतःच्या मृत्यूची बातमी पाहून सिद्धार्थ जाधवचा चढला पारा; व्हिडीओ शेअर करत दिलं उत्तर, म्हणाला..

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती
4

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.