Arijit Singh Retirement (Photo Credit- X)
अरिजीतने आपल्या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानताना लिहिले, “सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मला जो प्रतिसाद आणि प्रेम दिले, त्याबद्दल मी ऋणी आहे. पण मला हे जाहीर करताना दुःख होत आहे की, आतापासून मी पार्श्वगायक म्हणून कोणतेही नवीन काम स्वीकारणार नाही. मी या प्रवासात येथेच थांबत आहे.”
यामी गौतमच्या ‘या’ चित्रपटाचा पाकिस्तानात धुमाकूळ; OTTवर ट्रेंडिंगमध्ये, नायजेरियामधूनही मिळतय प्रेम
अरिजीतने जरी चित्रपटांसाठी गाणे सोडले असले, तरी तो संगीत निर्मिती थांबवणार नाही. त्याने स्पष्ट केले की, तो स्वतःला एक ‘लहान कलाकार’ मानतो आणि भविष्यात संगीताच्या विविध पैलूंचा अधिक जवळून अभ्यास करू इच्छितो. तो आता स्वतंत्र संगीत आणि स्वतःच्या प्रोजेक्ट्सवर लक्ष केंद्रित करणार आहे.
ज्या गाण्यांचे रेकॉर्डिंग आधीच पूर्ण झाले आहे किंवा जे प्रोजेक्ट्स पाइपलाइनमध्ये आहेत, ती गाणी चाहत्यांना ऐकायला मिळतील. त्यामुळे या वर्षात त्याचे काही शेवटचे चित्रपट मधील गाणी रिलीज होणार आहेत.
अरिजीत सिंगचे ‘मातृभूमी’ हे नवीन गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणे त्याने श्रेया घोषालसोबत गायले असून, संगीत हिमेश रेशमियाने दिले आहे. हा चित्रपट १७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, हे अरिजीतच्या शेवटच्या चित्रपट गाण्यांपैकी एक असू शकते.
अॅटली यांच्या AA22XA6 ची सर्वत्र चर्चा! दीपिका पादुकोण ‘या’ सिनेमात मुख्य भूमिकेत






