Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’चा थरार; चित्रपटात भावनांचा अनोखा संगम

वेगळ्या वाटेवर चालणारे, आशयघन आणि प्रभावी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी आता प्रेक्षकांसाठी एक नवा, थरारक अनुभव घेऊन येत आहेत ‘सालबर्डी’.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 13, 2026 | 06:16 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

चित्रपट ही केवळ कथा नसून ती भावना, दृश्ये आणि विचारांची सुंदर गुंफण असते. या गुंफणीत प्रत्येक धागा योग्य ठिकाणी बांधण्याचे कौशल्य दिग्दर्शकाकडे असते. त्यामुळेच एखाद्या चित्रपटाच्या यशामागील खरे सूत्र दिग्दर्शकाचा दृष्टिकोन आणि त्याची प्रभावी मांडणी यामध्ये दडलेले असते.चित्रपट साकारताना कथानकासोबतच दृश्यरचना, अभिनय, संगीत आणि तांत्रिक बाबी यांचा समतोल साधणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेव्हा या सर्व घटकांना सक्षम निर्मितीमूल्यांची जोड मिळते, तेव्हा ती कलाकृती अधिक प्रभावी ठरते.

अशाच वेगळ्या वाटेवर चालणारे, आशयघन आणि प्रभावी चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक रमेश साहेबराव चौधरी आता प्रेक्षकांसाठी एक नवा, थरारक अनुभव घेऊन येत आहेत ‘सालबर्डी’. सामाजिक आणि वास्तववादी विषयांवर ठसा उमटवणाऱ्या चौधरी यांनी यावेळी रहस्य आणि थरार यांची सांगड घालत एक उत्कंठावर्धक कथा पडद्यावर साकारली आहे. निर्माते अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांची भक्कम साथ लाभलेला हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारला असून, येत्या १७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

गुल्हर, बाबो, पाणीपुरी यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनंतर ‘सालबर्डी’मधून रमेश चौधरी प्रेक्षकांना एका गूढ आणि अस्वस्थ करणाऱ्या प्रवासावर घेऊन जाणार आहेत.

याबाबत ते सांगतात, “मला नेहमीच वेगळ्या कथा सांगायला आवडतात. ‘सालबर्डी’च्या माध्यमातून प्रेक्षकांना अशा एका रहस्यमय प्रवासावर नेण्याचा प्रयत्न आहे, जिथे प्रत्येक क्षणी नवं काहीतरी उलगडत जातं. हा केवळ मनोरंजनासाठीचा चित्रपट नाही, तर विचार करायला भाग पाडणारा आणि शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा अनुभव आहे.”

चित्रपटाची कथा गूढ घटनांच्या साखळीतून उलगडत जाते. प्रत्येक प्रसंगात दडलेलं रहस्य, अनपेक्षित वळणं आणि अंगावर काटा आणणारे क्षण प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवतात. ‘सालबर्डी’ हा केवळ थरारपट नाही, तर मनात प्रश्न निर्माण करणारा, अस्वस्थ करणारा आणि दीर्घकाळ लक्षात राहणारा अनुभव ठरणार आहे.

ग्रामीण महाराष्ट्राची रंगतदार कथा, ‘भागूबाई’ ट्रेलर रिलीज; Nirmiti Sawant पुन्हा मोठ्या पडद्यावर झळकणार

दुर्गम महाराष्ट्रातील ‘सालबर्डी’ गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट भय आणि रहस्य यांचा थरारक संगम साकारतो. ग्रामीण वातावरणात उलगडणारी ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ठरणार आहे. चित्रपटात Pooja Sawant, Shashank Shende, Omkar Bhojane, Bharat Ganeshpure, Anshuman Vichare, Rohit Kokate, Kamlakar Satpute, Chittaranjan Giri, Anil Nagarkar, Madhav Abhyankar आणि Pravin Dalimbkar यांसारख्या दमदार कलाकारांचा सहभाग आहे.

Ramesh Chaudhary यांच्या दिग्दर्शनातील ‘सालबर्डी’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण आणि वेगळा टप्पा ठरणार आहे. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता निर्माण झाली असून, या दमदार स्टारकास्ट आणि थरारक कथेमुळे ती आता अधिकच वाढली आहे.

Exclusive: ‘टिपिकल मुलगी साकारणं जास्त आव्हानात्मक’ अभिनेत्री पूर्वा कौशिकच्या ‘दीपज्योती’ मधील वेगळ्या प्रवासाला सुरूवात

Web Title: The suspense of salbardi unfolds in the style of ramesh chaudhary a unique blend of emotions in the film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Pooja Sawant

संबंधित बातम्या

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?
1

Dharmendra Pradhan Resignation: एक राजीनामा… आणि बॉलिवूडमध्ये खळबळ! प्रतिक्रियाांचा स्फोट! कोण काय म्हणालं?

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण
2

Entertainment News: ‘दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…’ अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा; इंडस्ट्रीत पुन्हा चर्चांना उधाण

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य
3

Sarvagunn Sampanna Movie: समाजाच्या ठराविक चौकटींना आव्हान देणारा ‘सरवगुणसंपन्न’; वाणी कपूरने सांगितलं चित्रपटाचं वैशिष्ट्य

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?
4

‘मला जबरदस्ती किस केलं अन्..’,करण कुंद्रावर सान्वी तलवारचा धक्कादायक आरोप, नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.