Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईपासून ते लोकांपर्यंत सगळीकडेच ‘दशावतार’ ची हवा! हाऊसफुल थिएटर्स मध्ये जोरदार चर्चा…

बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत असलेला दशावतार चित्रपट केवळ कथानकामुळेच नाही, तर प्रभावी मांडणी, दमदार अभिनय आणि आपल्या संस्कृतीशी जोडणाऱ्या आशयामुळेही रसिकांचे मन जिंकतोय.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 25, 2025 | 06:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

झी स्टुडियोजची प्रस्तुती असलेल्या आणि सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार’ला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच आठवड्यात हाऊसफुल्ल शोने धमाकेदार सुरुवात केलेल्या या चित्रपटाचा उत्साह तिसऱ्या आठवड्यातही अजिबात कमी झालेला नाही. उलट दिवसेंदिवस वाढतच आहे. बॉक्स ऑफिसवर भरभरून कमाई करत असलेला हा चित्रपट केवळ कथानकामुळेच नाही, तर प्रभावी मांडणी, दमदार अभिनय आणि आपल्या संस्कृतीशी जोडणाऱ्या आशयामुळेही रसिकांचे मन जिंकतोय.

मुंबईत मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही याबद्दल कायम एक नाराजीचा सूर असतो . अनेकदा मराठी चित्रपटाला प्राईम लोकेशन्सवर संधीही मिळत नाही, मिळाली तरी फार काळ टिकत नाही असंही चित्र अनेकदा बघायला मिळतं. मात्र ‘दशावतार’ने या सगळ्या अडथळ्यांना पार करत मराठा मंदिर, रॉक्सी, स्टर्लिंग, इरॉस, रिगल, आयनॉक्स, पॅलेडियम पीव्हीआर, कस्तुरबा, मिलाप अशा थिएटर्समध्ये सलग तीन आठवडे हाऊसफुल्ल शोज दिले आहेत. विशेष म्हणजे या थिएटर्समध्ये साधारणपणे हिंदी, इंग्रजी वा गुजराती चित्रपटांचीच भर असते. अशा ठिकाणी मराठी चित्रपटाने एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठी सोबतच अमराठी प्रेक्षकांची गर्दी खेचली आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

याहून अधिक आनंदाची गोष्ट म्हणजे कोकणातील यश. साधारणपणे कोकणात चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. अगदी बॉलिवूडचे मोठे चित्रपटही तिथे थिएटर्स हाऊसफुल्ल करत नाहीत. परंतु ‘दशावतार’ने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी, पेण, कणकवली, महाड, चिपळूण या सर्व भागातील प्रत्येक थिएटरमध्ये हा चित्रपट लागला आहे आणि प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली आहे. पर्यावरण, निसर्ग, कोकणी माणूस आणि दशावतार कलेवर आधारलेले कथानक स्थानिक प्रेक्षकांना इतके भिडले आहे की, ‘खूप काळाने आपल्या मातीची, आपल्या कलेची गोष्ट सांगणारा चित्रपट पाहायला मिळतोय’, अशी भावना तेथील प्रेक्षक व्यक्त करत आहेत.

शाहरुख खान आणि गौरी खानविरुद्ध समीर वानखेडेने तक्रार केली दाखल, ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ संबंधित प्रकरण

या चित्रपटाने फक्त बॉक्स ऑफिसवर माया कमावली नाही तर जनमानसात एक चळवळ उभी करण्याचं कामही केलं आहे. कोकणातील जमिनी, देवराया, निसर्ग वाचवण्यासाठी कोकणी माणूस पुढाकार घेताना आज दिसत आहे. कोकणातील कातळशिल्पांबाबत, त्याच्या संवर्धनासाठी तो सजग झाला आहे. ज्या दशावतारी कलाप्रकाराचा आधार या चित्रपटात घेतला गेला, ती लोककला आणि दशावतारी कलाकार यांना पुन्हा तेजी मिळवून देण्यासाठी हा चित्रपट कारणीभूत ठरतो आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आलेली मरगळ झटकून मराठी चित्रपटाची ताकद दाखवून देण्यात दशावतार हा चित्रपट आज अग्रणी ठरला आहे.

अभिनेता सोनू सूद मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीसमोर हजर, पोलिसांची चौकशी सुरु; काय आहे प्रकरण?

झी स्टुडिओजची प्रस्तुती, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांचे असून त्यांच्यासह सुजय हांडे, ओंकार काटे, अशोक हांडे, आदित्य जोशी, नितिन सहस्त्रबुद्धे, मृणाल सहस्त्रबुद्धे, संजय दुबे आणि विनायक जोशी चित्रपटाचे निर्माते आहेत. अजित भुरे या चित्रपटाचे सृजनात्मक निर्माते असून यात दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Web Title: There is a lot of buzz about dasavatar there is a lot of buzz in housefull theaters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Sushant Singh Rajput च्या केसनंतर रियाची आध्यात्मिक साधना; दिवसातून ७ वेळा करते हनुमान चालीसा पठण
1

Sushant Singh Rajput च्या केसनंतर रियाची आध्यात्मिक साधना; दिवसातून ७ वेळा करते हनुमान चालीसा पठण

Shaktiman : शक्तिमान परतणार! पहिल्या भारतीय सुपरहिरोचं दमदार कमबॅक, आता गंगाधर दिसणार नाही तर ऐकता येईल
2

Shaktiman : शक्तिमान परतणार! पहिल्या भारतीय सुपरहिरोचं दमदार कमबॅक, आता गंगाधर दिसणार नाही तर ऐकता येईल

अभिषेक बच्चनवर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; म्हणाला, ”त्यांचा आशीर्वाद..”
3

अभिषेक बच्चनवर कोसळला दु: खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन; म्हणाला, ”त्यांचा आशीर्वाद..”

अरुण गवळींच्या लेकीने दिली आनंदाची बातमी, ‘हा’ टीव्ही अभिनेता होणार लवकरच ‘डॅडी’
4

अरुण गवळींच्या लेकीने दिली आनंदाची बातमी, ‘हा’ टीव्ही अभिनेता होणार लवकरच ‘डॅडी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.