Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’चा ट्रेलर लाँच, चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास

'टँगो मल्हार' चित्रपटातून उद्योजिका, शास्त्रज्ञ साया दाते मराठी चित्रपसृष्टीत पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास दाखवला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2025 | 11:34 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • साया दाते दिग्दर्शित ‘टँगो मल्हार’चा ट्रेलर लाँच
  • ‘टँगो मल्हार’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
  • ‘टँगो मल्हार’ चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट

मराठी चित्रपटसृष्टीत नवनवीन चित्रपट पाहायला मिळत आहे. तसेच, प्रेक्षक नेहमीच मराठी चित्रपट पाहण्यासाठी तयार असतात. आता अश्यातच नवाकोरा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास सांगणारा ‘टँगो मल्हार’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. संगणक शास्त्रज्ञ तसेच उद्योजिका असलेल्या साया दाते यांनी आगामी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अशोकमामा उघडू शकतील का रक्ताच्या नात्यांचे बंद दरवाजे? अशोक मा.मा. मालिकेत नवं वळणं

या अनोख्या नावामुळे आणि अत्यंत लक्षवेधी अशा ट्रेलरमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य आर्थिक स्थिती असलेल्या मल्हार नावाच्या एका रिक्षाचालकाच्या आयुष्यात टँगो हा अर्जेंटाईन नृत्य प्रकार कसा येतो, त्यानंतर त्याला त्या नृत्य प्रकाराबद्दल काय वाटतं, मल्हारचं आयुष्य यामुळे कसं बदलून जातं या आशयावर हा चित्रपट बेतला आहे. त्याबरोबरच नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा भावनांचं चित्रणही मनाला भावतं. चित्रपटाच्या ट्रेलरमधील प्रत्येक फ्रेममधून चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.

अनोखी संकल्पना, दमदार पटकथेसह संगीत, संकलन, छायांकन अशा तांत्रिक आघाड्यांवरही उत्तम काम झाल्याचं या ट्रेलरमधून जाणवतं. अशा संकल्पनांवर जागतिक स्तरावर उत्तमोत्तम चित्रपट झाले आहेत. आता त्याच तोडीचा एक वेगळा प्रयत्न आणि तो ही मराठी चित्रपटसृष्टीत होतो आहे हे नक्कीच लक्षवेधी आणि अभिमानास्पद आहे.

Rise And Fall: ‘इज्जत राखणं हे आपल्या हातात आहे…त्याने मात्र’, धनश्री वर्माने केली युझवेंद्रच्या वागणुकीची पोलखोल

मूळच्या कम्प्युटर इंजिनिअर आणि उद्योजक असलेल्या साया दाते यांनी “टँगो मल्हार” चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पहिलच पाऊल दमदारपणे टाकलं आहे. साया दाते, मनीष धर्मानी यांनी चित्रपटाचं लेखन, तर साया दाते यांनीच चित्रपटाचं दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारी उत्तम रितीने पार पाडली आहे. सुमेध तरडे, ओंकार आठवले यांनी छायांकन, क्षमा पाडळकर यांनी संकलन, तुषार कांगारकर यांनी ध्वनि आरेखन, शार्दूल बापट, उदयन कानडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी निभावली आहे. नीतेश कांबळे, कीर्ति विश्वनाथन, सीमा वर्तक, अक्षय गायकवाड, मनीष धर्मानी, मनीषा महालदार, संदेश सूर्यवंशी, पंकज सोनावणे यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका पाहायला मिळणार आहेत.

Web Title: Trailer launch of marathi movie tango malhar directed by saya date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema

संबंधित बातम्या

नीता अंबानींचा वाढदिवस उत्साहात साजरा; गुलाबी सूटमध्ये दिसला ग्लॅमरस लूक, टीमने दिले सरप्राईज
1

नीता अंबानींचा वाढदिवस उत्साहात साजरा; गुलाबी सूटमध्ये दिसला ग्लॅमरस लूक, टीमने दिले सरप्राईज

King Is Back! ‘डर नहीं, दहशत हूं’…’, शाहरुख खान पुन्हा अ‍ॅक्शन अवतारात, ‘किंग’ चित्रपटाचे शीर्षक जाहीर
2

King Is Back! ‘डर नहीं, दहशत हूं’…’, शाहरुख खान पुन्हा अ‍ॅक्शन अवतारात, ‘किंग’ चित्रपटाचे शीर्षक जाहीर

‘मरण्याची घाई नाही…’, इंडस्ट्रीपासून ब्रेक घेण्याबद्दल काय म्हणाले सतीश शाह? मृत्यूच्या दोन तास आधी पत्नीला केला मेसेज
3

‘मरण्याची घाई नाही…’, इंडस्ट्रीपासून ब्रेक घेण्याबद्दल काय म्हणाले सतीश शाह? मृत्यूच्या दोन तास आधी पत्नीला केला मेसेज

६० वर्षांचा झाला King Khan; मन्नतबाहेर दिसली चाहत्यांची गर्दी, “भारताचा अभिमान, शाहरुख खान…” असे दिले नारे
4

६० वर्षांचा झाला King Khan; मन्नतबाहेर दिसली चाहत्यांची गर्दी, “भारताचा अभिमान, शाहरुख खान…” असे दिले नारे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.