Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या शिवरायांचा अनोखा प्रवास, ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

'शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटानंतर आता पुन्हा एकदा शिवराय जनतेच्या प्रेमासाठी आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्श

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 12, 2025 | 01:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी लढणार महाराज
  • मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी चित्रपटाचे केले कौतुक
सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा बहुचर्चित आणि महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यापूर्वी चित्रपटाच्या टिझरच्या माध्यमातून प्रेक्षकांची उत्सुकता वाढलेली असताना आता चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विशेष उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अनेक मोठं मोठ्या कलाकारांची हजेरी लागली. महाराष्ट्राची प्रेरणा आणि अस्मितेचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज आजच्या काळात अवतरतात आणि इथल्या शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची दखल घेण्यासाठी लढतात अशी रोचक कल्पना असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलरने अंगावर शहारे आणले. द ग्रेट मराठा एन्टरटेनमेंट, सत्य-सई फिल्म्स आणि क्रिझोल्हची निर्मिती असलेला हा चित्रपट झी स्टुडिओजच्या माध्यमातून येत्या ३१ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.

‘दोन्ही स्वप्न आज पूर्ण झाली…’ फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्री छाया कदम भावुक, म्हणाली…

चित्रपटाच्या या ट्रेलर लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले की ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रखरपणे मांडणारा चित्रपट आहे. महाराष्ट्राबद्दलच्या संवेदना मनात जाग्या असल्याशिवाय असे चित्रपट घडत नाहीत. शेतकऱ्यांचा विषय अशा पद्धतीने मांडणं हे धाडसाचं काम आहे आणि हे धाडस आजच्या घडीला फक्त महेश मांजरेकर करु शकतात हेही तितकंच खरं आहे. आातापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेल्या कलाकृती या इतिहासावर आधारित होत्या. परंतू हा चित्रपट इतिहास आणि वर्तमानाच्या सुरेख संगमावर उभा राहून शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा आहे. या चित्रपटाला प्रेक्षक उचलून धरतील यात शंकाच नाही.”

 


या प्रसंगी दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ‘’शेतकरी आत्महत्येचा विषय मला अनेक वर्षांपासून अस्वस्थ करत होता. या विषयाचा सखोल अभ्यास करताना मला जाणवलं की, यावर काहीतरी करायलाच हवं. समाजासमोर हा प्रश्न मांडायला हवा. राष्ट्रीय पुरस्कार विजेते बालकलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांना घेऊन एक चित्रपट करण्याचा विचार करत होतो आणि त्या प्रक्रियेत या चित्रपटाची निर्मिती झाली. सध्याच्या काळातील शेतकऱ्यांची स्थिती पाहून महाराज किती संतप्त होऊ शकतात, हे या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाचा आहे.”

चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारणारे अभिनेते सिद्धार्थ बोडखे म्हणाला की, महाराजांची भूमिका साकारायला मिळणं ही एक खूप मोठी जबाबदारी आहे. यात शिवरायांचं प्रचंड संतप्त आणि उद्विग्न रूप प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी खूप साऱ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास करावा लागला अर्थात त्यात महेश मांजरेकर सरांची खूप मदत झाली. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल असा ठाम विश्वास आहे.”

Filmfare 2025: फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये मराठमोळ्या छाया कदम यांचा डंका, ‘लापता लेडीज’साठी फिल्मफेअर पुरस्काराने गौरव

चित्रपटात इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने ,नित्यश्री ज्ञानलक्ष्मी आणि सयाजी शिंदे हे मातब्बर कलाकार बघायला मिळणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय पुरस्कार विजेते बाल कलाकार त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि पटकथा महेश मांजरेकर यांची असून संवादलेखन सिद्धार्थ साळवी यांनी केले आहे. राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध यांनी याची निर्मिती केली असून झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: Trailer of the film punha shivajiraje bhosale released mns chief raj thackeray praised mahesh manjrekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 01:49 PM

Topics:  

  • mahesh manjrekar
  • marathi cinema
  • raj thackeray

संबंधित बातम्या

सायली संजीव आणि शशांक केतकर दिसले रोमँटिक अंदाजात, ‘कैरी’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज
1

सायली संजीव आणि शशांक केतकर दिसले रोमँटिक अंदाजात, ‘कैरी’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित
2

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’! चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद
3

‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद, नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद

वडील – मुलीच्या नात्यावर अनोखी सांगड घालणारं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस; रंगभूमीवर परतले महेश मांजरेकर
4

वडील – मुलीच्या नात्यावर अनोखी सांगड घालणारं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस; रंगभूमीवर परतले महेश मांजरेकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.