Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उमेश कामत आणि प्रिया बापटची ‘हे काय नवीन?’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस; उलघडणार नात्यांच्या वास्तवाला भिडणारी कथा

उमेश कामत आणि प्रिया बापट ही प्रसिद्ध जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. अशातच आता या दोघांची आगामी वेब सीरिज प्रदर्शित होणार आहे, ज्याचे नाव आहे ‘हे काय नवीन?’.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 27, 2026 | 02:24 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • उमेश कामत आणि प्रिया बापट पुन्हा एकत्र
  • ‘हे काय नवीन?’ वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस
  • उलघडणार नात्यांच्या वास्तवाला भिडणारी कथा
मराठी मनोरंजनविश्वात कायम चर्चेत राहणारे जोडपे उमेश कामत आणि प्रिया बापट आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘हे काय नवीन?’ या आगामी वेब सीरिजमधून हे दोघेही एक वेगळ्या टप्प्यावर पोहोचलेल्या नात्याची गोष्ट उलगडताना दिसणार आहे. हलक्याफुलक्या रोमँसपासून वास्तवाच्या छटांपर्यंतचा प्रवास दाखवणारी ही मालिका प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता निर्माण करत आहे.

‘कप बशी’मध्ये दिसणार सासू-सुनेच्या नात्याची हटके गोष्ट; कधी प्रदर्शित होणार हा धमाल कौटुंबिक चित्रपट?

‘आणि काय हवं’ या लोकप्रिय मालिकेनंतर आता ‘हे काय नवीन?’ मध्ये या जोडप्याचा पुढचा प्रवास पाहायला मिळणार आहे. याबद्दल बोलताना उमेश म्हणाला की, ‘पहिल्या भागात हे दोघं नवविवाहित होते. उत्साह, प्रेम आणि हलक्याफुलक्या क्षणांनी भरलेलं आयुष्य जगणारे. मात्र या नव्या भागात ते त्यांच्या आयुष्याच्या अधिक प्रगल्भ टप्प्यावर पोहोचले आहेत. चाळिशीत प्रवेश केल्यानंतर नात्यांमध्ये येणारे बदल, जबाबदाऱ्या, वास्तवातील समस्या आणि त्यांना सामोरं जाण्याची पद्धत याचं वास्तववादी चित्रण या सीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या प्रवासाची खासियत म्हणजे, हे जोडपं प्रत्येक परिस्थितीला एकत्र, थोड्या विनोदाने आणि उबदारपणाने कसं सामोरं जातं, हे प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.’ असे अभिनेत्रीने सांगितले आहे.

या सीरिजच्या मुळाशी असलेलं लेखनही तितकंच प्रभावी आहे. लेखक वरुण नार्वेकर यांच्या लेखनशैलीबद्दल बोलताना उमेश म्हणाला, साध्या आणि दैनंदिन नात्यांकडे पाहण्याची त्यांची दृष्टी खूप वेगळी आणि खास आहे. छोट्या-छोट्या गोष्टीतून भावनांचे बारकावे उलगडण्याची त्यांची ताकद या कथेत प्रकर्षाने जाणवते. विनोद आणि संवेदनशीलता यांचा समतोल साधत त्यांनी ही कथा अधिक जिवंत केली आहे. उमेशच्या मते, या प्रोजेक्टमुळे त्याला केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे, तर व्यक्ती म्हणूनही स्वतःकडे नव्याने पाहण्याची संधी मिळाली.

या मालिकेत उमेशसोबत प्रिया बापट पुन्हा एकदा दिसणार असून, त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीची जादू पुन्हा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. वास्तव आयुष्यातील जोडी पडद्यावर साकारताना त्यांच्यातील समज आणि केमिस्ट्री अधिकच खुलून येते, हे याआधीही प्रेक्षकांनी पाहिलं आहे.

Ranbir Kapoor च्या ‘रामायण’बद्दल मोठी अपडेट, हनुमान जयंतीला दिसणार प्रभू रामाची नवी झलक

एकत्र काम करण्याच्या अनुभवाबद्दल उमेश पुढे म्हणाला, ;कथेमध्ये ते दोघं खूप व्यावसायिक पद्धतीने काम करतात. दिग्दर्शक काही सूचना देत असतील, तर ते एकमेकांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. मात्र, काही प्रसंगी त्याच्यातला ‘नवरा’ पुढे येतो आणि तो प्रियाला एखादी गोष्ट सुचवतो. चित्रीकरणाच्या धावपळीत कधी कधी तणाव निर्माण होतो, पण अशा वेळी एकमेकांना समजून घेणं आणि साथ देणं महत्त्वाचं ठरतं आहे.

एका प्रसंगाचा उल्लेख करताना अभिनेता म्हणाला, ‘प्रिया थोडी अस्वस्थ झाल्यावर त्याने तिला शांत केलं आणि तिच्या कामाबद्दल आत्मविश्वास दिला हीच त्यांच्या नात्याची खरी ताकद आहे.’ असे तो म्हणाला. आता ‘हे काय नवीन?’ ही वेब सीरिज लवकरच ZEE5 वर प्रदर्शित होणार असून, नात्यांचा वास्तववादी प्रवास आणि भावनांचा सुंदर मिलाफ अनुभवण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

Web Title: Umesh kamat priya bapat he kay navin web series zee5 marathi varun narvekar director

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
1

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
2

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!
3

Trump-Zelensky News : युक्रेनला मिळणार Patriotची ताकद; ट्रम्प यांनी घेतला ‘अंतिम निर्णय’!

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम
4

Inspector Manju Satya Manju Wedding: सत्या-मंजूच्या लग्नसोहळ्याची खास झलक! अंतरपाटावर उमटलं चाहत्यांचं प्रेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.