(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू आहे. 2025 मध्ये अनेक कलाकारांनी लग्नबंधणात अडकल्याचे पाहायला मिळाले. प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारी, जय दुधाणे या सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली. आता ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातारने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी गायत्रीने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत तिच्या जोडीदाराविषयीचा खुलासा केला होता. आता गायत्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिच्या सुपारीचा आहे. या तिचे दोन्ही कुटुंब सुपारी फोडताना दिसत आहे. या व्हिडिओत तिने तिच्या कुटुंबाचे फोटो देखील शेअर केले आहेत. तर शेवटच्या फोटोमध्ये ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पेढा भरवताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने ”सुपारी फुटली..” असं कॅप्शन देखील दिले आहे. या व्हिडिओवर अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन देखील केले आहे.
‘Kabhi Khushi Kabhi Gham 2’वर करण जोहरची तयारी सुरू, जाणून घ्या मुख्य कलाकार आणि शूटिंगची अपडेट
ख्रिसमसच्या दिवशी गायत्रीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची सर्व चाहत्यांना ओळख करून दिली होती. ‘माझ्या आयुष्यातील सांताला भेटा’ असं कॅप्शन देत तिने खास व्हिडीओ पोस्ट केला. गायत्रीच्या जोडीदाराचं नाव श्रीकांत चवरे असं आहे. आणि लवकरच लग्नबंधणात अडकणार आहे. श्रीकांतचं इन्स्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केल्याचं बायोमध्ये लिहिलंय. त्याचसोबत तो ड्रोन फोटोग्राफरसुद्धा आहे. श्रीकांतला फिरण्याची आणि फोटोग्राफीची खूप आवड आहे. गायत्रीने होणाऱ्या नवऱ्याची ओळख करून दिल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. धनश्री काडगांवकर, रेश्मा शिंदे, प्रीतम कागणे यांसारख्या सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा दिल्या होत्या.
गायत्री दातारच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तिने मराठी बिग बॉस ३ मध्ये भाग घेतला होता. तसेच हिंदी मालिकेत ‘मेरे साईं : श्रद्धा और सबूरी’ मध्ये काम केले आहे. ‘तुला पाहते रे’ ही मालिका 2018 मध्ये झी मराठी वाहिनीवर प्रसारित झाली होती, ज्यात सुबोध भावे आणि गायत्री दातार यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. ही मालिका वर्षभर प्रेक्षकांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली. मालिकेनंतर गायत्रीने ‘डान्सिंग क्वीन’ आणि अलीकडेच ‘अबीर गुलाल’ या मालिकेत काम केले






