(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नुकताच पुणे येथे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी चित्रपटाचे ग्रँड इव्हेंट मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे. ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ मध्ये शिवरायांची भूमिका कोण साकारणार? हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. आणि अखेर आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
“आईबाबा आणि साईबाबांच्या आशिर्वादाने…”, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संतोष जुवेकरने दिली Good News!
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या ‘शिवराज अष्टक’ या ८ चित्रपटांच्या प्रोजेक्टमधील ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या सहाव्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कोण दिसणार? या प्रश्नाचं उत्तर अखेर उघड झालं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने आयोजित एका सोहळ्यात भरजरी वस्त्र, आकर्षक जिरेटोप, आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला लटकणारी भवानी तलवार अशा रुबाबात घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार अवतरले. या आगामी मराठी चित्रपटातील प्रसंगाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले, या कार्यक्रमातच शिवछत्रपतींच्या भूमिकेतील अभिनेत्याचा चेहरा समोर आला.
या कार्यक्रमात भव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल ताशांच्या गजराची साथ हे सगळंच अगदी भारावून टाकणारं होतं. तसेच ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी मराठी चित्रपटातील प्रसंगाच्या सादरीकरण भारावून टाकणारे होते. शिवछत्रपतींच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक होते. तर या सिनेमात छत्रपती शिवरायांच्या रूपात अभिनेता अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे. तसेच त्याला पाहून त्याचे चाहते देखील खूप खुश झाले. पॅनोरमा स्टुडिओज, मुगाफी निर्मित आणि दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित हा सिनेमा येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड
या कार्यक्रमात ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती ज्यामध्ये, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, निखिल राऊत, नूपुर दैठणकर यांसारखे अनेक कलाकार उपस्थित होते. तसेच या चित्रपट महाराजांची आग्रा भेट ही एक अत्यंत जोखमीची घटना होती. आणि त्यांच्या नेतृत्वाची, कर्तृत्वाची खरी झलक पाहायला मिळणार आहे.
दरम्यान शिवराज अष्टकातील आतापर्यंतच्या पाच चित्रपटांमध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकरने शिवछत्रपतींची भूमिका साकारली होती. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ या सिनेमांमध्ये तो शिवछत्रपतींच्या भूमिकेत झळकला होता. परंतु आता ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ या आगामी चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र दिसणार आहे.






