सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक दिग्गज अभिनेत्यांच्या चित्रपटामध्ये चांगलीच चुरस दिसत आहे. एकीकडे अभिनेता धनुषचा कॅप्टन मिलर (Captain Miller) तर दुसरीकडे महेश बाबूचा गुंटुर करम (Gunrur Karam) तेजा सज्जाचा हनुमान (Hanuman) यांसारख्या चित्रपटांच्या स्पर्धेत अभिनेता विजय सेतुपती (Vijay Setupati) आणि कतरिना कैफ (Katribna Kaif) यांचा नुकताच रिलीज झालेला मेरी ख्रिसमस (Merry Christma) काहीसा मागे पडलेला दिसत आहे. रिलीजच्या चौथ्या दिवशी सोमवारी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुहेरी अंकी कलेक्शन केले. आतापर्यंत चित्रपटानने 11.38 कोटी कमावले आहे.
[read_also content=”कतरिना-विजयचा ‘मेरी ख्रिसमस’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल! https://www.navarashtra.com/movies/merry-christmas-will-release-on-netflix-ott-soon-nrps-498510.html”]
मेरी ख्रिसमस चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहे. मात्र, चित्रपटाला प्रेक्षकांचा फार प्रतिसाद मिळताना दिसत नाही आहे. Sacnilk वेबसाइटनुसार, चित्रपटां पहिल्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर 2.45 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी 3.45 कोटी, तिसऱ्या दिवशी 3.83 कोटी तर चौथ्या दिवशी 1.65 कोटी कमावले. चित्रपटानं आतापर्यंत 11.38 कमावले आहेत. तर कॅप्टन मिलरने आतापर्यंत 30.87 कोटी, गुंटुर करमने 83.4 कोटी तर हनुमान चित्रपटानं आतापर्यंत 55.85 कोटींचा व्यवसाय केला आहे.
मेरी ख्रिसमस चित्रपटात कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांच्यासोबत टिनू आनंद, संजय कपूर आणि विनय पाठक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. चित्रपटात राधिका आपटेचा कॅमिओ आहे. बदलापूर आणि अंधाधुनचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर ते एक मर्डर मिस्ट्री आहे. चित्रपटात एका रात्रीची कथा दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये मारिया आणि अल्बर्ट एकमेकांच्या प्रेमात पडतात.