अंबरनाथ शहराच्या पश्चिमेकडील स्वामी नगर परिसरातील शास्त्रीनगर भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. हंडाभर पाणी मिळवण्यासाठी महिलांना स्टेशन परिसरापर्यंत जावे लागत असून, गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांचे हाल होत आहेत. स्थानिक महिलांनी प्रशासन आणि राजकीय नेत्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांचा आरोप आहे की, निवडणुका जवळ आल्या की मतांसाठी येणारे पुढारी, आमच्या पाणी समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.