अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असलेल्या प्रसिद्ध शनी मारुती मंदिरात दीपावलीच्या पंचमीच्या शुभमुहूर्तावर ५६ पदार्थांचा महाभोग आयोजित करण्यात आला. माळीवाडा पंचमंडळ देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित या भव्य धार्मिक सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली. मंदिर परिसर फुलांच्या आकर्षक सजावटीने आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. संध्याकाळी सामूहिक हनुमान चालीसा पठण, भजन आणि आरतीनंतर वीर हनुमान आणि शनैश्वर देवांना ५६ प्रकारच्या विविध नैवेद्यांचा महाभोग अर्पण करण्यात आला.