मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर
सगळ्यांचं पनीर खायला खूप जास्त आवडते. पनीरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पनीरपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. जेवणात काहींना काही चमचमीत खाण्याची इच्छा झाल्यास पनीर टिक्का, पालक पनीर, मटार पनीर इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हॉटेल स्टाईल हरभरा पनीर बनवू शकता. पनीर खाल्यामुळे शरीराला पोषण मिळते. यामध्ये असलेले प्रोटीन, कॅल्शियम आणि इतर आवश्यक घटक शरीरासाठी आवश्यक ठरतात. हिरव्या मसाल्यात केलेल्या भाज्या चवीला अतिशय सुंदर लागतात. हिरवी मिरची आणि पालकच्या मिश्रणात बनवलेले पनीर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. हरभरा पनीर तुम्ही चपाती, तंदूर रोटी किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया हरभरा पनीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’






