
kanika mann naagin 7
अभिनेत्री कनिका मान हिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातल्या काळ्या घटनेबाबत सांगितलं आहे. कानिका म्हणते की, माझं बालपण एका वाईट घटनेने हिरावून घेतलं. जेव्हा कनिका चौथीत होती तेव्हा तिच्या चुलत भावानेच तिच्या गैरवर्तन केलं. त्याचा स्पर्श तिला नकोसा वाटत होता. त्यावेळी लैंगिक शिक्षणाबाबत माहिती नसल्याने ती प्रचंड घाबरली. तिला वाटलं की, आपण आता गरोदर राहिलो तर.. या भितीने ती पपई खायची. कारण घरातल्या मोठ्या स्त्रियांच्या गप्पा ऐकताना हे कळलं होतं की, पपई खाल्याने गर्भपात होतो. कनिका पुढे असंही म्हणाली की, त्या घाणेरड्या स्पर्शाचा इतका माझ्या मनावर वाईट परिणाम झाला की, भितीपोटी मी पपई खायची. लहानपणी मनावर झालेला हा आघात अभिनेत्रीने इतके वर्ष दाबून ठेवला आणि आता तिने यावर जाहीरपणे सांगितलं आहे.
या गैरवर्तनाबाबात सांगताना ती म्हणाली की, जेव्हा मी शाळेच्या सुट्ट्यांमध्ये नातेवाईंरकांकडे जायची तेव्हा माझा चुलत भाऊ माझ्याशी घाणेरडं वागायचा. कनिका इतकी घाबरली की, तिने घरी आई वडिलांना कधी सांगितलं नाही. या सगळ्या प्रकरणात आपल्यालाच दोषी ठरवलं जाईल अशी तिचा भिती वाटायची. या सगळ्या प्रकरणाचा तिच्या मनावर खुप खोलवर परिणाम झाला. त्यामुळे तिला यातून बाहेर पडण्यासाठी कित्येक वर्ष गेली. आजही प्रत्येक मुलगी प्रत्येक महिलेच्या अज्ञानाचा, वयाचा आणि असहाय्यतेचा गैरफायदा उचलत अनेक जण तिच्या जीवाशी खेळतात आणि याची त्यांना शिक्षा देखील मिळत नाही, ही बाब लज्जास्पद आहे.कनिकाच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीबाबत सांगायचं तर, सध्या की नागिन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याआधी तिने गुड्डन तुमसे ना हो पाये गा या मालिकेतून घराघरात पोहोचली.
“मी माझी लाज बाजूला ठेवली….” ‘बंदर’ चित्रपटासाठी बॉबी बॉबी देओलचा कम्फर्ट झोनला रामराम!