Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shubh Shravani: ‘आता येईल खरी मज्जा’ मोक्षाच्या लग्नादिवशी भूतकाळातील धक्कादायक सत्य उघड!

झी मराठीवरील ‘शुभ श्रावणी’ मालिकेत मोक्षाच्या लग्नादिवशी भूतकाळातील धक्कादायक सत्य उघड होत मोठा ट्विस्ट येणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 05, 2026 | 02:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘शुभ श्रावणी’ सध्या प्रेक्षकांसाठी जबरदस्त नाट्यमय वळण घेऊन येत आहे. मोक्षाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस तिचं लग्न आनंदाने सुरू असताना अचानक भूतकाळातील एक धक्कादायक सत्य समोर येणार आहे. मोक्षचा एक्स बॉयफ्रेंड अचानक तिच्या आयुष्यात परत येत तिला ब्लॅकमेल करतो आणि त्यामुळे संपूर्ण लग्नसोहळ्यावर संकटाचं सावट पसरतं.

Dhurandhar: The Revenge ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुस्साट! चित्रपटाने रिलीजआधीच स्वतःचाच मोडला रेकॉर्ड

या ब्लॅकमेलिंगमुळे मोक्षा पूर्णपणे कोलमडून जाते. मानसिक तणावाच्या भरात ती आत्महत्येचा प्रयत्न करत असतानाच श्रावणी तिथे वेळेवर पोहोचते. श्रावणी मोक्षाला धीर देते, तिला समजावते आणि मन मोकळं करण्याची संधी देते. अखेर मोक्षा श्रावणीसमोर आपल्या आयुष्यातील संपूर्ण सत्य उघड करते. या कबुलीमुळे श्रावणी आणि शुभ मोक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. मोक्षाच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवण्यासाठी शुभ आणि श्रावणी त्याला गाठतात. या प्रसंगात प्रेक्षकांना शुभचा थरारक आणि जबरदस्त फाईट सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे, जो मालिकेतील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.

दुसरीकडे, अलकनंदा आणि मदन नव्या अफवा पसरवतात की शुभ आणि श्रावणी पळून गेले आहेत. या अफवांमुळे लग्नात गोंधळाचं वातावरण तयार होतं. तरीही मोक्षाचे लग्नविधी सुरूच राहतात. अशा परिस्थितीत श्रावणी मोक्षाला ठामपणे सांगते की, “जे घडलं आहे ते आधी कार्तिकला सांग, आणि त्यानंतरच या लग्नासाठी उभी राहा.” सप्तपदीसाठी उभी राहताना मोक्षाला श्रावणीचे शब्द आठवतात. ती धैर्य एकवटून कार्तिकला बाजूला घेते आणि त्याच्यासमोर संपूर्ण सत्य मांडते. हे ऐकून कार्तिक तिथून निघून जातो. सर्वांना वाटतं की लग्न तुटलं आहे. मात्र, खरा प्रश्न असा आहे की आता मोक्षाचं लग्न निर्विघ्नपणे पार पडेल का?

“मी आता प्रेमात…”, अखेर Talwiinder ने दिली प्रेमाची कबुली; दिशा पटानीसोबतच्या डेटिंग वर स्पष्ट बोलला गायक

याच दरम्यान लग्नातील हलकाफुलका प्रसंगही रंगतो. नवरदेवाची चप्पल चोरण्याच्या नादात चुकून अलकनंदाचीच चप्पल चोरीला जाते. त्या चप्पलेखाली अलकनंदाने विश्वंभरचा फोटो लावलेला असतो. ही चप्पल जेव्हा सगळ्यांसमोर येईल, तेव्हा कोणता नवा स्फोटक खुलासा होणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. भावनिक, रोमांचक आणि नाट्यमय घटनांनी भरलेले ‘शुभ श्रावणी’चे हे भाग प्रेक्षकांनी नक्की पाहावेत. दररोज संध्या ७:०० वाजता, फक्त आणि फक्त झी मराठीवर.

Web Title: Past of the moksha will be revelead on her wedding at shubh sharavani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • zee marathi

संबंधित बातम्या

नव्या मराठी मालिकेच्या वादग्रस्त सीनवर प्रेक्षकांचा संताप; “हा काय प्रकार? बंद करा ही मालिका!” म्हणत केली टीका
1

नव्या मराठी मालिकेच्या वादग्रस्त सीनवर प्रेक्षकांचा संताप; “हा काय प्रकार? बंद करा ही मालिका!” म्हणत केली टीका

Zee Natya Gaurav Puraskar 2026: “उत्सव रंगभूमीचा, सोहळा रंगकर्मींचा” दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
2

Zee Natya Gaurav Puraskar 2026: “उत्सव रंगभूमीचा, सोहळा रंगकर्मींचा” दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत रंगला सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.