Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित, ‘गाडी नंबर १७६०’ मध्ये झळकणार प्रथमेश- प्रियदर्शिनीची फ्रेश जोडी

प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 22, 2025 | 03:21 PM
प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित, ‘गाडी नंबर १७६०’ मध्ये झळकणार प्रथमेश- प्रियदर्शिनीची फ्रेश जोडी

प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे ‘झननन झाला’ गाणं प्रदर्शित, ‘गाडी नंबर १७६०’ मध्ये झळकणार प्रथमेश- प्रियदर्शिनीची फ्रेश जोडी

Follow Us
Close
Follow Us:

प्रेम ही भावना प्रत्येकासाठी खास असते. प्रेमात पडल्यावर प्रत्येक क्षण जादूने भारलेला वाटतो. अशाच जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेमात पडल्यावर मनात उमटणाऱ्या स्पंदनांना आणि गोड अनुभवांना स्पर्श करणारं हे गाणं प्रथमेश परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या दोघांची फ्रेश आणि लोभसवाणी केमिस्ट्री गाण्याला एक वेगळाच लुक आणि फील देते.या गाण्याला आशीष कुलकर्णी याचा सुरेल आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी शब्दांनी गाणं अधिकच खुलून आलं आहे. गाण्याला मधुर आणि भावनिक संगीत दिलं आहे.

“ओढ तुझ्या पंढरीची…”, अजय गोगावलेच्या आवाजातलं भक्तिगीत ऐकलंत का ? पालखी प्रस्थानाच्या शुभमुहूर्तावर गाणं प्रदर्शित

समीर सप्तीसकर यांनी, जे प्रेमभावनेला एका सुंदर चालीत गुंफून प्रेक्षकांच्या मनात झनकार निर्माण करतं. ‘झननन झाला’ या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन पवन-बॉब यांनी केलं आहे. या गाण्याविषयी दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “प्रेमात पडल्यावर मनात उमटणाऱ्या भावना शब्दांत मांडणं कठीण असतं. पण ‘झननन झाला’ गाणं त्या भावना प्रेक्षकांपर्यंत अगदी सुंदरपणे पोहोचवतं. या गाण्यात केवळ रोमँटिक क्षण नाहीत, तर त्यामागील नाजूक भावना, गोंधळलेलं मन, आणि त्या पहिल्या प्रेमाची धडधडही आहे. गाण्याचं शब्द, संगीत आणि अभिनय यांची सांगड इतकी सुंदरपणे बसली आहे की, प्रेक्षक गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या प्रवासात सामील होतात.”

‘Metro ची कथा आजच्या पिढीशी जोडलेली…’, अनुपम खेर यांनी दिग्दर्शक अनुराग बसूचे केले कौतुक

तर चित्रपटाचे निर्माते कैलाश सोरडी म्हणतात, “चित्रपटातील ‘झननन झाला’ हे गाणं आजच्या पिढीच्या प्रेमाच्या भावना अत्यंत प्रभावीपणे दाखवतं. आम्हाला खात्री आहे की हे गाणं प्रत्येकाच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करेल. ‘झननन झाला’ या गाण्याद्वारे आम्ही प्रेक्षकांना प्रेमाच्या त्या गोडस्पर्शी जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यातली प्रत्येक फ्रेम, प्रत्येक क्षण प्रेमाने भरलेला आहे. जेव्हा आम्ही हे गाणं पाहिलं, तेव्हा आम्ही जाणवलं, की हे गाणं फक्त ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. आम्ही अत्यंत मेहनतीने आणि मनापासून हे गाणं सादर केलं आहे. मला खात्री आहे हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.”

“वरवरचं हसताना, कधीतरी विष पिऊन आणि…” तुषार घाडीगावकर आत्महत्या प्रकरणावर मराठमोळ्या अभिनेत्याची डोळ्यात अंजन टाकणारी पोस्ट

तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. येत्या ४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Web Title: Prathamesh parab priyadarshini indalkar starrer gaadi number 1760 marathi movie zanana jhala song released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2025 | 03:21 PM

Topics:  

  • marathi film
  • Marathi Film Industry
  • marathi movie
  • News Song

संबंधित बातम्या

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा
1

तो देवाचा माणूस आहे ! मर्डर, थ्रिल आणि सस्पेन्सने भरलेल्या ‘दशावतार’ चित्रपटचा ट्रेलर अंगावर आणेल काटा

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
2

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी
3

कढीपत्ता! ‘अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी’, भूषण पाटीलच्या नव्या चित्रपटातून उलगडणार अनोखी प्रेमकहाणी

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित
4

‘टँगो मल्हार’ चित्रपटातून उलगडणार एका रिक्षा चालकाचा प्रेरणादायी प्रवास, ‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.