अभिनेत्री राखी सांवत (Rakhi Sawant) ही तिच्या कामामुळे कमी आणि तिच्या वक्तव्यामुळे जास्त चर्चेत असते. मनोरजंन क्षेत्राशी निगडीत काहीही विषय असेल तर त्यावर बोलण्यात राखी सांवत कायम पुढे असते. आता नुकतचं सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेला गोळीबार प्रकरण चांगलच गाजतय. यावरुन अनेक सेलेब्रिटींनी सलमान विषयी काळजी व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात आता अभिनेत्री राखी सावंतनेही एक व्हिडिओ पोस्ट करुन सलमान खान विषयी काळजी व्यक्त केली आहे.
[read_also content=”ओडिशात मोठी दुर्घटना! प्रवाशांनी भरलेली बस पुलावरुन खाली पडली, 5 जणांचा मृत्यू https://www.navarashtra.com/india/5-passenger-died-after-bus-fall-from-over-bridge-in-odisha-nrps-524227.html”]
गेल्या रविवारी हल्लेखोरांनी सलमान खानच्या मुंबईतील घर गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार केला. पोलीस तपासात गुंतले आहेत. आज या प्रकरणात गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आली आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर अभिनेत्याचे चाहते आणि जवळचे लोक चिंतेत आहेत. आता याप्रकरणी राखी सावंतची प्रतिक्रिया समोर आली आहे. या प्रकरणावर चिंता व्यक्त करत त्यांनी हल्लेखोरांना सलमान खानच्या सुरक्षेसाठी वाचवण्याचे आवाहन केले आहे.
राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती कॅमेऱ्यासमोर रडताना दिसत आहे. ‘असे करू नका, माझ्या भावाला करू नका’ असे राखी सावंत म्हणत आहे. कृपया, मी हात जोडून, बिश्नोई टोळी, मी तुला विनवणी करते. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे. सलमानने अनेक लोकांची घरे वाचवली आहेत. अनेक गरीब लोकांचे भले केले आहे. मी हात जोडतो, तुम्हाला काय मिळणार? त्यांच्यामुळे, त्यांच्या एनजीओमुळे किती घरे सुरू आहेत.
राखी सावंत पुढे म्हणते, त्याने माझ्यासारख्या गरीबांसाठी त्याने माझ्या आईसाठी खूप काही केले आहे. माझ्या आईचे ऑपरेशन झाले, लाखो लोकांचे ऑपरेशन झाले. तो वर्षभर लोकांना मदत करतो, सलमान खान माझा भाऊ आहे, मी त्याची बहीण आहे, कृपया असे करू नका.
या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक सलमान खानसाठी प्रार्थना करत आहेत तर काहीजण राखी सावंतला ट्रोल करत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल भियानी यांनी शेअर केला आहे. एका यूजरने लिहिले की, ‘पहिल्यांदा राखीने काही चांगले बोलले, यावेळी तिला सपोर्ट करायला हवा’. एका यूजरने लिहिले की, ‘इतके प्रयत्न करूनही तुझे अश्रू येत नाहीत’. एका यूजरने लिहिले की, ‘राखी, देवाने तुला हे टॅलेंट दिले आहे, ते फक्त देवाला परत दे’.