नेहमी काही ना काही वक्तव्य करुन चर्चेत राहणारी अभिनेत्री राखी सावंतचा (Rakhi Sawant) पुर्व पती आदिल खान (Adil Khan) दुर्रानी सध्या त्याच्या दुसऱ्या लग्नावरुन चर्चेत आला आहे. आदिलने बिगबॅास 12 फेम सोमी खानसोबत लग्नगाठ बांधली. या लग्नावरुन आता मनोरंजन क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चा होऊ लागल्या आहेत. आदिल आणि सोमीच्या लग्नावरुन नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. या सगळ्या प्रश्नावरुन आता आदिलनं मौन सोडलं असून हे आपलं पहिलंच लग्न असल्याचं त्यानं म्हण्टलं आहे.
[read_also content=”राखी सावंतचा माजी EX Husband आदिल खान दुर्राणी दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर, बिग बॉस 12 फेम सोमी खानशी केलं लग्न! https://www.navarashtra.com/movies/rakhi-sawants-ex-husband-adil-khan-durrani-marries-somi-khan-of-bigg-boss-12-513598.html”]
आदिल खाननं सोमी खानशी ३ मार्च रोजी निकाह केला आहे. निकाह पार पडल्यानंतर आदिल आणि सोमी खाननं फोटो शेअर केले. आदिल आणि राखीचे संबध वादग्रस्त राहिले आहेत. अशाच आता आदिलनं दुसरं केल्यानं राखी सावंतला चांगलाच धक्का बसला आहे. त्यांन स्पष्टपणे म्हण्टलं आहे की हे त्याचं पहिलं लग्न आहे. सध्या तो बंगळुरुमध्ये आहे आणि मुंबईत आल्यानंतर या बाबतीत खुलासा करणार असल्याचं सांगितलं आहे.
आदिलच्या आधी राखीचे लग्न रितेशसोबत झाले होते. या दोघांनी बिग बॉस 15 च्या घरात एकत्र प्रवेश केला होता, परंतु शोच्या ग्रँड फिनालेनंतर लगेचच ते वेगळे झाले. फेब्रुवारी 2022 मध्ये राखीने रितेशपासून वेगळे झाल्याबद्दल सांगितले.