एनर्जेटिक रणवीर सिंगची हळवी बाजू, 'सिंघम अगेन'च्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमध्ये केलेल्या कृतीमुळे अभिनेत्याचे कौतुक
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या मोस्ट अवेटेड ‘सिंघम अगेन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट पार पडला. ट्रेलर लाँचिंग इव्हेंटसाठी चित्रपटातली टीमही उपस्थितही होती. यावेळी, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अजय देवगण, रणवीर सिंग, अर्जुन कपूर, करीना कपूर खान, रवि किशन आणि टायगर श्रॉफ हे कलाकार उपस्थित होते. इतक्या तगड्या स्टारकास्टचा आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटसाठी अनेक फॅन्सने उपस्थिती लावली होती. सध्या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
‘सिंघम अगेन’ चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट एका ऑडिटोरियममध्ये ठेवण्यात आला होता. ऑडिटोरियममध्ये अनेक चाहत्यांनीही उपस्थिती लावली होती. आपले आवडत्या कलाकाराच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँचिंग इव्हेंट आहे, म्हटल्यावर चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. या गर्दीमधून अभिनेता रणवीर सिंग वरती जात असतो. त्या गर्दीमध्ये एक चिमुकली रडत असते. ती रडत असताना अभिनेत्याने तिला कडेवर उचलून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत तिच्या आईकडे तिला सुपूर्द केले.
हा व्हिडिओ ‘व्हिरल भयानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम चॅनलवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, गर्दीच्या गऱ्हाड्यातून रणवीर वरती जात असतो. ऑडिटोरियममध्ये गर्दी इतकी होती की, व्यवस्थित चालायलाही जागा नव्हती. एक लहान मुलगी तिच्या आईसोबत या ट्रेलर लाँचिंग इव्हेंटला आली होती. गर्दी जास्त असल्यामुळे ती चिमुकली रडायला लागली. लहानग्या मुलीला रणवीरने कडेवर घेतलं होतं. तिला कडेवर घेऊन तिला तिच्या आईकडे सुपूर्द केलं.
रणवीरचा हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असून अभिनेत्याचे प्रेक्षक कौतुक करीत आहेत. व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.