आदिपुरूष (Adipurush) या चित्रपटाला दमदार ओपनिंग मिळालं असलं तरी, या चित्रपटाच्या कथानकात आणि VFX मध्ये काही दम नसल्याचं प्रेक्षकांचं मत आहे. एकूणच या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली आहे. चित्रपटातील तगडी स्टारकास्ट मात्र चित्रपटगृहात प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करत आहे. प्रभास,क्रिती सॅनॉन आणि सैफ अली खानमुळे प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. त्यात पुन्हा एकदा सैफ अली खान (saif ali khan) व्हिलनच्या भूमिकेत आहे. त्याने रावणाची भूमिका साकारली आहे. पण, हा रावण वादाच्या भोव-यात अडकला आहे.
एका सीनमध्ये रावण हा चक्क अजगरांमध्ये पडलेला दिसत आहे. हे पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स रामायणावर तयार झालेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर नाराजी व्यक्त केली आहे. सैफचा पायथन मसाज करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

चाहते निराश….पैसेही मागितले परत!!!
चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आदिपुरूषबाबत निगेटीव्ह कमेंटस् येत आहेत. एका यूजरने ट्विटरवर लिहिले की, ‘चलो ये वाला मसाज भी देख लो, तर एकाने म्हटलं आहे… ‘डिझास्टर मूव्ही’. काही तर चाहते सोशल मीडियावर मजेदार मीम्स शेअर करत आहेत.
सैफ खलनायकाच्या भूमिकांमध्ये अधिक लोकप्रिय ठरला
सैफ हिरो सारखा जरी दिसत असला तरी, तो हिरोच्या भूमिकेपेक्षा व्हिलनच्या भूमिकेत प्रेक्षकांना अधिक भावला. व्हिलनच्या भूमिकेत त्याने स्वत: ला सिद्ध केलं. त्यामुळेच कदाचित ‘आदीपुरुष’ मधील रावणाच्या भूमिकेसाठी अगदी परफेक्ट ठरला. त्याच्या आतापर्यंतच्या निगेटीव्ह भूमिकांवर प्रकाशझोत टाकूयात…
‘लाल कप्तान’
2019 मध्ये आलेला सैफचा ‘लाल कप्तान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. मात्र या चित्रपटातील सैफचा लूक प्रचंड व्हायरल झाला होता. या चित्रपटात सैफने नागा साधूची भूमिका साकारली होती.

[read_also content=”‘आदिपुरुष’ सिनेमातील सीतेच्या एका डायलॉगवरुन नेपाळमध्ये वाद, सिनेमाच्या निर्मात्यांना दिली 3 दिवसांची मुदत, सगळ्याच हिंदी सिनेमांना दिला इशारा https://www.navarashtra.com/entertainment/sita-is-not-a-daughter-of-india-nepal-objection-over-dialogue-in-adipurush-nrsr-417973/”]
‘तानाजी: द अनसंग वॉरियर’
सैफने साकारलेल्या सर्वात भयानक आणि भितीदायक खलनायकाच्या भूमिकांपैकी एक म्हणजे ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ मधील त्याची भूमिका. या चित्रपटात सैफ अली खानने मराठ्यांच्या विरोधात लढणाऱ्या उदयभान सिंह राठोडची भूमिका साकारली होती.

‘ओमकारा’
‘ओमकारा’ या चित्रपटात सैफही नकारात्मक भूमिकेत दिसला होता. 2006 मध्ये आलेल्या या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. या चित्रपटात अजय देवगण, सैफ अली खान, विवेक ओबेरॉय, करीना कपूर खान, कोंकणा सेन शर्मा आणि बिपाशा बसू यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

‘क्या कहना’
प्रीती झिंटा, सैफ अली खान आणि चंद्रचूड सिंग यांचा हा चित्रपट एक कौटुंबिक चित्रपट होता. या चित्रपटात सैफने एका श्रीमंत लाडावलेल्या माणसाची भूमिका साकारली होती. इथेही सैफने निगेटिव्ह भूमिका जबरदस्तपणे साकारली.

‘आदिपुरुष’
या यादीतील शेवटचं पण बहुचर्चित नाव म्हणजे ‘आदिपुरुष’….ज्यामध्ये सैफने रावणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी ओम राऊतने सैफची उंची 8 फूट वाढवली असून त्याला लार्जर दॅन लाइफ दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे.







