'आता थांबायचं नाय' चित्रपटाचं संजय राऊतांकडून कौतुक; म्हणाले "हा चित्रपट आमिर खानने केला असता तर..."
शिवराज वायचळ दिग्दर्शित, ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचे प्रेक्षकांसह अनेक सेलिब्रिटींनी आणि समीक्षकांनी भरभरुन कौतुक केलं आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्रात भरघोस कमाई केली. सिनेरसिकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी केली होती. बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाई केल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवरही दाखल झालाय. सर्वत्र कौतुक होत असताना नेते संजय राऊतांनीही चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं आहे.
“प्रत्येक मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही…”; मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार रावची प्रतिक्रिया…
पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ‘आता थांबायचं नाय’ चित्रपटाचे कौतुक केले आहे. मायक्रो ब्लॉगिंग असणाऱ्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हिंदी भाषा सक्ती विरोधातल्या मुद्द्यावर ट्विट केलंय की, “झी ५ वरील ‘आता थांबायचं नाय’हा जबरदस्त मराठी चित्रपट आहे. नक्की पाहा! सध्या मराठी सिनेमा खरंच एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. मराठी अस्मिता म्हणजे इतर भाषिकांवर राग काढणे नव्हे, तर आपली संस्कृती, भाषा, आणि कला अभिमानाने जगासमोर मांडणे. जय महाराष्ट्र!” राजदीप सरदेसाई यांनी केलेल्या या ट्वीटला संजय राऊत यांनी उत्तर दिलंय.
रविवारची Reco: ‘आता थांबायचं नाय’ — झी ५ वरील एक जबरदस्त मराठी चित्रपट. नक्की पाहा!
सध्या मराठी सिनेमा खरंच एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.
मराठी अस्मिता म्हणजे इतर भाषिकांवर राग काढणे नव्हे, तर आपली संस्कृती, भाषा, आणि कला अभिमानाने जगासमोर मांडणे.
जय महाराष्ट्र! 🇮🇳
for those…— Rajdeep Sardesai (@sardesairajdeep) July 6, 2025
टॉलिवूड अभिनेता महेश बाबू अडकला कायदेशीर अडचणीत, नेमकं प्रकरण काय?
शेअर केलेल्या ट्वीटमध्ये संजय राऊत यांनी लिहिलंय की, “होय, राजदीप, ‘आता थांबायचं नाय’ हा जबरदस्त मराठी चित्रपट मी पहिला! कथा, दिग्दर्शन आणि कलावंतांनी हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे! सफाई कामगारांच्या जीवनावर इतके ज्वलंत भाष्य मी अनुभवले नव्हते. हा चित्रपट आमिर खान वैगरेनी केला असता तर सरकारपासून देशभरातील समीक्षकांनी वेगळा विषय म्हणून त्याला डोक्यावर घेतला असता. राष्ट्रीय पुरस्कार आणि ऑस्कर पुरस्कारपर्यंत त्याला ढकलला असता. हा चित्रपट पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी पाहायलाच हवा, त्यांना खरा देश कळेल!” संजय राऊत यांनी काही तासांपूर्वी केलेलं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतंय.
होय,
राजदीप, “ आता थांबायचं नाय
हा जबरदस्त मराठी चित्रपट मी पहिला!
कथा, दिग्दर्शन आणि कलावंतांनी हा चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे! सफाई कामगारांच्या जीवनावर इतके ज्वलंत भाष्य मी अनुभवले नव्हते.
हा चित्रपट आमिरखान वैगरेनी केला असता तर सरकार पासून देशभरातील समीक्षकांनी… https://t.co/jolvDtnMWa— Sanjay Raut (@rautsanjay61) July 7, 2025