फोटो सौजन्य - इन्टाग्राम
दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबू कायदेशीर अडचणीत सापडला आहे. हैदराबादमधील एका डॉक्टरने तक्रार दाखल केली आहे की त्यांच्यासोबत ३४ लाख रुपयांचा कथित रिअल इस्टेट घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याला पाठिंबा दिल्याबद्दल सुपरस्टारला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्हा ग्राहक आयोगाने महेश बाबूला ही नोटीस पाठवली आहे. याआधीही महेश बाबू यांनी एका रिअल इस्टेट कंपनीला पाठिंबा दिला होता. आता याचदरम्यान आणखी एक प्रकरण कानी पडले आहे.
संपूर्ण प्रकरण काय आहे
डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्हा ग्राहक आयोगाने दक्षिणेचा सुपरस्टार महेश बाबूला ३४ लाख रुपयांच्या कथित रिअल इस्टेट घोटाळ्याला पाठिंबा दिल्याबद्दल कायदेशीर नोटीस बजावली आहे. हैदराबादमधील एका डॉक्टरने तक्रार दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. तक्रारीत असे म्हटले आहे की डॉक्टरने प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या प्लॉटसाठी ३४.८ लाख रुपये दिले होते. या संपूर्ण प्रकरणाबाबत अभिनेत्याने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही आहे.
“प्रत्येक मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही…”; मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार रावची प्रतिक्रिया…
एप्रिलमध्ये ईडीने त्यांची चौकशी केली
अहवालानुसार, महेश बाबू या अभिनेत्याचे तिसरे आरोपी म्हणून नाव देण्यात आले आहे. तक्रारीत त्यांच्यावर साई सूर्या डेव्हलपर्स फर्मचे प्रमोशन करण्याचा आणि खरेदीदारांची दिशाभूल करण्याचा आरोप आहे. याआधीही सुपरस्टार रिअल इस्टेट घोटाळ्याबाबत कायदेशीर अडचणीत सापडला आहे. एप्रिल २०२५ मध्ये, ईडीने साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुपशी संबंधित मनी लाँड्रिंगबाबत महेश बाबू यांची चौकशी केली होती.
Kshitish Date: चित्रपट, नाटक आणि आता वेब विश्वात पदार्पण, “मिस्त्री” मध्ये साकारणार अनोखी भूमिका
महेश बाबूने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही
सध्या या संपूर्ण प्रकरणात महेश बाबू किंवा अभिनेत्याच्या टीमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘गुंटूर करम’ चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. सध्या महेश बाबू ‘SSMB २९’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील दिसणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.