तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणामध्ये (Tunisha Sharma Suicide Case) रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शिझान खानचे (Sheezan Khan) वकील शैलेंद्र मिश्रा (Shailendra Mishra) यांनी आता एक नवी माहिती शेअर केल्याने तुनिषा प्रकरणात नव्या नावाची एन्ट्री झाली आहे. वकील शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितलं की, तुनिषाची आई वनिता आणि संजीव कौशल तिला पूर्ण कंट्रोल करायचे. संजीव कौशल हे नाव ऐकल्यावर तुनिषाला पॅनिक अटॅक यायचे. संजीव कौशल आणि वनिता शर्मा तुनिषाचे आर्थिक व्यवहार सांभाळायचे.
तुनिषा की मां और संजीव कौशल ही तुनिषा को पूरा कंट्रोल करते थे। संजीव कौशल का नाम सुनते ही तुनिषा को पैनिक अटैक आता था। संजीव कौशल और वनिता तुनिषा पर और उसके पैसे पर पूरा कंट्रोल करते थे: शैलेंद्र मिश्रा, शीज़ान के वकील https://t.co/c00fa8hfim
— ANI_HindiNews (@AHindinews) January 2, 2023
तुनिषाचे आपल्या कुटुंबासोबतचे संबंध चांगले नव्हते. तिच्या वडिलांच्या निधनानंतर ती उदास असायची. आपल्या वडिलांसोबतच तिने शेवटचा वाढदिवस साजरा केला होता. तिला यावर्षी पुन्हा वाढदिवस साजरा करायचा होता. तुनिषाची आई आणि संजीव कौशल यांचा संबंध काय होता ? याची चौकशी व्हायला हवी, असंही मिश्रा यांनी म्हटलं आहे.
[read_also content=”भाजपात चाललंय काय? जे पी नड्डांच्या कार्यक्रमाला फडणवीस, मुंडे भगिनींची अनुपस्थिती, फडणवीसांना ताप तर मुंडे भगिनींना निमंत्रणच नाही https://www.navarashtra.com/maharashtra/what-is-going-on-in-bjp-absence-of-fadnavis-munde-sisters-at-jp-nadda-event-fadnavis-fever-and-munde-sisters-not-invited-358629/”]
शैलेंद्र मिश्रांच्या आरोपानंतर संजीव कौशल या नावाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.संजीव कौशल हे तुनिषाच्या वडिलांचे बालपणीचे मित्र आहेत. शिझानच्या कुटुंबियांनी सांगितलं की, संजीव कौशल यांच्यासोबत तुनिषाचे चांगले संबंध नव्हते. तुनिषाने चंदिगढमध्ये राहावं, अशी संजीव यांची इच्छा होती. तुनिषाची आई वनितादेखील यासाठी तयार होती. मात्र तुनिषाला हे मान्य नव्हतं. तुनिषासमोर संजीव यांचं नाव घेतलं तरी तिला टेन्शन यायचं. संजीव कौशल यांच्या सांगण्यावरून तुनिषाच्या आईने तिचा फोन तोडून तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता.
तुनिषा आणि शिझानने ब्रेकअपनंतर मुव्ह ऑन केलं होतं. या प्रकरणात लव्ह-जिहादचा काही संबंध नाही, असेही शर्मा यांनी सांगितले आहे.