Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप, तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

प्लॅनेट मराठी पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. माजी सहसंस्थापक सौम्या विळेकर यांनी देखील प्लॅनेट मराठीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Feb 05, 2025 | 03:12 PM
प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप, तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यावर फसवणुकीचा आरोप, तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Close
Follow Us:

मराठीतील पहिलावहिला ओटीटी म्हणून नावारूपास आलेल्या प्लॅनेट मराठी पुन्हा एका नव्या वादात सापडले आहेत. यापूर्वीही प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर यांच्याविरोधात अनेक प्रकरणे दाखल झाली आहेत. ज्यामध्ये दुबईमधील गुंतवणूकदारांचा समावेश आहे. यांच्यासह मीडिया प्रोफेशनल आयुष शाह आणि ‘ताराराणी’ चित्रपटाच्या निर्मात्या यांनीही त्यांच्यावर केसेस केल्या आहेत. सुमारे ३० कोटींची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. अनेक कंपन्यांनी प्लॅनेट मराठीला एनसीएलटीमध्ये लिक्विडेशनसाठी नेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. सोबतच आता माजी सहसंस्थापक सौम्या विळेकर यांनी देखील प्लॅनेट मराठीविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक मृत्यू झाला. त्या वैयक्तिक दुःखात असताना प्लॅनेट मराठीकडून होणारा नाहक त्रासामुळे त्यांनी प्लॅनेट मराठीविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे.

ऐश्वर्या नाही तर करिश्मा कपूर असती बिग बींची सून; कोणत्या कारणामुळे मोडलं अभिषेकसोबतचं लग्न

प्लॅनेट मराठीच्या सहसंस्थापक असलेल्या सौम्या विळेकर यांनी जानेवारी २०२४ मध्ये प्लॅनेट मराठी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी याबाबत मीडियामध्ये अधिकृत घोषणाही केली होती. २०२३ मध्येच कंपनीच्या व्यवहारांमध्ये मोठे मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर कंपनीत असलेल्या त्यांच्या मोठ्या हिस्सेदारीबाबत देखील त्यांनी उघड केले होते. यापूर्वीही प्लॅनेट मराठी व अक्षय बर्दापूरकर यांच्याविरुद्ध अनेक तक्रारी आणि लेख प्रकाशित झाले आहेत. यापैकी काही प्रकरणे स्वत: सौम्या विळेकर यांनी कोर्टात दाखल केली आहेत, त्यात ७ करोडचे चेक्स बाऊन्स, फसवणूक, अनेक पुरवठादारांना खोटी माहिती देऊन गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याच्या फौजदारी तक्रारी दाखल झाल्सा आहेत.

फोटो सौजन्य: PR Agency

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी संगमात केले पवित्र स्नान; गंगा मातेची पूजा करतानाचे फोटो व्हायरल!

सौम्या विळेकर या प्रकाराबद्दल म्हणतात, “मी २०१९ पासून कंपनीत अधिकृतपणे सामील झाले होते. जेव्हा सर्व काही व्यवस्थित आणि नैतिक पद्धतीने चालू होते, तेव्हा मी कंपनीच्या यशासाठी काम करत होते. पण काही व्यवहारांमध्ये मला जबरदस्तीने सामील करण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे मला कंपनी सोडावी लागली. आजपर्यंत शेअर्सच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि माझ्या एक्झिटशी संबंधित अनुपालन पूर्ण झालेले नाही. ज्यामुळे माझ्या बाजूने कायदेशीर अडचणी निर्माण होत आहेत. कंपनीत कार्यरत असताना माझ्या परिचयांकडून, कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवाराकडून कंपनीसाठी गुंतवणूक केली होती. पण त्या काळात घेतलेले काही चुकीचे निर्णय आणि त्यातून निर्माण झालेल्या वादामुळे मला मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

Gene Barge: अमेरिकन सॅक्सोफोन वादक डॅडी जी यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन, शिकागोमध्ये घेतला कलाकाराने अखेरचा श्वास!

सौम्या विळेकर पुढे म्हणातात, “मी या सगळ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनेकदा चर्चा करण्यासही विचारणा केली होती. परंतु समोरून मला सकारात्मक प्रतिसाद न आल्याने आणि खोटी आश्वासने आल्याने कायदेशीर प्रक्रिया करण्याशिवाय माझ्यासमोर कोणता पर्यायच उरला नाही. मला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे, ती सगळ्या गोष्टींची नीट तपासणी करून या परिस्थितीचे समाधान करेल, ज्यामुळे मला आणि इतरांनाही खूप त्रास झाला आहे. मी कंपनीचा ताबा देऊन १ वर्षाहून अधिक काळ लोटला आहे म्हणून, मी न्यायालयाला विनंती करते, की मला कंपनीतून सुरळीत एक्झिट द्यावी.”

‘चंद्रमुखी,’ ‘गोष्ट एका पैठणीची,’ ‘तमाशा लाईव्ह’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांनी या प्लॅटफॉर्मला एक वेगळी ओळख दिली होती. प्लॅनेट मराठीने दर्जेदार कंटेंट आणि नवनवीन प्रयोगांमुळे आपले स्थान निर्माण केले होते आणि त्याने अनेक लोकांच्या मनात ठसा उमठवला होता. मात्र, सध्या त्यांच्या प्रतिष्ठेला तडा गेला असून प्लॅनेट मराठी वादांच्या भोवऱ्यात अडकले आहे.

Web Title: Saumya vilekar has filed a complaint against akshay bardapurkar the head of planet marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 03:12 PM

Topics:  

  • Entertainment News
  • planet marathi

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न
1

महाराष्ट्राचे ‘भाऊजी’ बांदेकर आता होणार सासरे, सोहम बांदेकर लवकरच ‘या’ अभिनेत्रीसह करणार लग्न

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
2

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश
3

Planet Marathi चे संस्थापक Akshay Bardapurkar यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचा FIR चा आदेश

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास
4

Jyoti Chandekar Passes Away: ‘ठरलं तर मग’फेम ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.