फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आज आपला ४९ वा वाढदिवस साजरा करतोय. बॉलिवूडच्या शहनशहांचा मुलगा असूनही अभिषेक साधा-सरळ आहे. माणूस म्हणूनही तो खूप मोठा असल्याचं त्याचे अनेक सेलिब्रेटी मित्र म्हणतात. गेल्या ३० वर्षांपासून बच्चन कुटुंबाला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. पण फक्त अभिषेकच्याच नाही तर, बच्चन कुटुंबातील इतर सदस्यांच्या वागण्या-बोलण्यातही ते स्टारडम केव्हाही दिसून आलेलं नाही.
Prem Dhillon: कॅनडामधील गायक प्रेम ढिल्लन यांच्या घरावर गोळीबार, या गँगने उचलली हल्ल्याची जबाबदारी!
सेलिब्रेटी मित्रांमध्ये गेल्यावर अभिषेक सगळं विसरुन हसतो, खेळतो, मजा मस्ती करत गप्पा मारतो. अभिषेकचा हा अंदाज अनेकदा त्याच्या फॅन्सने कपिल शर्मा शोमध्ये पाहिला असेल. अभिषेकचं फिल्मी करिअर म्हणावं असं यशस्वी ठरलं नाही. त्याला वडिलांसारखं काम जमलं नाही. जरीही अभिषेकचं फिल्मी करिअर फार चर्चेत राहिलं नाही तरीही त्याने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कायमच चाहत्यांमध्ये अभिनयामुळे नाही तर वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत लव्हस्टोरीमुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लव्हस्टोरींबद्दल जाणून घेऊया.
‘छावा’ चित्रपटाआधी विकी कौशल आणि अक्षय खन्ना होते एकमेकांचे पक्के शत्रू? कारण जाणून वाटेल आश्चर्य!
‘रेफ्यूजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्याला कलाविश्वामध्ये १८ वर्ष पूर्ण झाली. या करिअरच्या काळात अभिषेकचे काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचे गाजले. २०२४ ह्या वर्षात अभिषेक- ऐश्वर्या कमालीचे चर्चेत राहिले. त्यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार रंगली होती. ज्युनिअर बच्चन आणि मिस वर्ल्ड या दोघांची जोडी जमलीच नसती, कारण अभिषेक बच्चनचा आघाडीच्या अभिनेत्रीसह साखरपूडा झाला होता. मात्र तो साखरपूडा एका अटीमुळे मोडला. त्यानंतर मिस वर्ल्ड बच्चन कुटुंबियांची सून झाली. अभिषेकचं लग्न ऐश्वर्याऐवजी दुसऱ्याच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीसोबत होणार होतं. अभिषेक बच्चन आणि त्या अभिनेत्रीचा साखरपुडाही झाला होता. मात्र नक्की काय घडलं ज्यामुळे लग्न होऊ शकलं नाही? ती अभिनेत्री कोण? जाणून घेऊयात.
“अरे हा तर चायनाचा माल निघाला…”; ‘लक्ष्मीनिवास’चा थुकरट टीझर पाहून नेटकरी संतापले
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन या दोघांचाही साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर त्यांनी लग्नाच्या दिशेने एक पाऊलही टाकलं होतं. पण त्यांचं काही कारणांमुळे लग्न मोडलं. करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन या दोघांनीही एकमेकांना जवळपास ५ वर्ष डेट केलं होतं. करिश्माला अभिषेक बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याच्या आधीपासूनच आवडायचा. करिश्मा आणि अभिषेक या दोघांनी ५ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर नात्यात पुढे जायचं ठरवलं. या दोघांच्या निमित्ताने बॉलिवूडमधील दिग्गज घराणं असलेलं कपूर आणि बच्चन एकत्र आले होते. करिश्मा आणि अभिषेक आणि दोघांचा 2002 साली साखरपूडा झाला. सर्व आनंदी होते. मात्र दोघांचा विवाह काही होऊ शकला नाही. दोघांचा साखरपूडा मोडला.
Sooraj Pancholi: अभिनेता सूरज पंचोलीला गंभीर दुखापत, ॲक्शन सीनमध्ये स्फोट करताना झाली गडबड!
अभिषेक आणि करिश्मा या दोघांचा साखरपूडा मोडण्याला जया बच्चन कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्माने लग्नानंतर अभिनय क्षेत्र सोडायला हवं, अशी इच्छा जया बच्चन यांची होती. मात्र कपूर कुटुंबिय आणि करिश्माला ही अट मान्य नव्हती. अभिषेक आणि करिश्मा दोघांनी अखेरीस ‘मैने भी प्यार किया’ या सिनेमात अभिनय केला होता. सुनील दर्शन हे या सिनेमाचे दिग्दर्शक होते. सुनील दर्शन यांनी मीडियासह बोलताना अभिषेक आणि करिश्माच्या ब्रेकअपबाबत खुलासा केला होता. “दोघांचं नातं हे खरंखुरं होतं. दोघेही लग्न करणार होते. मी साखरपुड्याला गेलो होतो. मात्र दोघेही एकत्र काम करायचे तेव्हा भांडायचे. ते दोघेही मेड फॉर इच अदर या पठडीतले नव्हते, कायमच भांडायचे. हे खरंच एकमेकांसाठी बनले आहेत का? असा मी विचार करायचो. दोघेही चांगले आहेत, मात्र दोघांच्या नशिबात दुसरंच काही होतं”, सुनील दर्शन यांनी म्हटलं होतं.
Parvati Nair: ‘द गोट’ फेम अभिनेत्रीने केला साखरपुढा; सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी!
अभिषेकने साखरपूडा मोडल्यानंतर ऐश्वर्या रायला डेट केलं. दोघांनी ‘कुछ ना कहो’ या सिनेमात पहिल्यांदा एकत्र काम केलं. त्यानंतर ‘गुरु’सिनेमातून दोघांच्या लव्ह स्टोरीने आकार घेतला, दोघांते सूर जुळले. त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला लग्नासाठी प्रपोज केलं. त्यानंतर 2007 साली दोघांचा विवाह झाला. मात्र सध्या दोघांच्या घटस्फोटाची चर्चा आहे.