फोटो सौजन्य - BCCI/ सोनू सूद
सोनू सूद : भारताच्या संघाने उपांत्य फेरीमध्ये इंग्लंडच्या संघाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली आहे. त्याचबरोबर दोन्ही संघानी T२० विश्वचषक २०२४ च्या (T-20 World Cup 2024) या स्पर्धेमध्ये एकही सामना न गमावता फायनलमध्ये प्रवेश करणारे दोन्ही संघ आहे. भारताचा समोर आज दक्षिण आफ्रिकेचे (India vs South Africa) आव्हान असणार आहे. आजचा हा सामना बार्बाडोसमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाला देशातून नेते, कलाकार, बॉलीवूडमधून शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे. क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताच्या संघाचे एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये स्वप्न भंगले होते त्यामुळे आजच्या सामन्यात भारताचा संघ अशी कोणतीही चुकी करणार नाही ज्यामुळे पुन्हा भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागेल. त्याचबरोबर क्रिकेट चाहत्यांनी भारतीय क्रिकेट खेळाडूंना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेरणा दिली आहे. यादरम्यान बॉलीवूडचा अभिनेता सोनू सूद अंतिम फेरीच्या उत्साहात सामील झाला आहे.
सोनू सूदने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्याने भारतीय संघाला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने लिहिले, “टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन… वर्ल्ड कप आमचा आहे.”
जागतिक स्तरावर देशाला पाठिंबा देणे असो किंवा नागरिकांना मदत करणे असो सोनू सूद नेहमीच देशासाठी आपले योगदान देण्यासाठी पुढे आला आहे. आरोग्यसेवा, शिक्षण आणि जनसामान्यांमध्ये एकता वाढविण्याच्या सूदच्या कठोर प्रयत्नांनंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना जनतेचा नायक म्हणून घोषित केलं !
दरम्यान कामाच्या आघाडीवर सोनू सूद त्याच्या पहिल्या दिग्दर्शित उपक्रम ‘फतेह’ वर काम करत आहे. ज्यामध्ये तो नसीरुद्दीन शाह आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसेल. ‘फतेह’ हा आगामी सायबर क्राइम थ्रिलर असून त्यात ॲक्शनचे मिश्रण आहे, जे हॉलीवूडच्या कलाकारांच्या बरोबरीने राहण्याचे वचन देते. हा चित्रपट यावर्षी लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाच्या संदर्भात तो बऱ्याचवेळा फोटो आणि त्याच्या चाहत्यांना अपडेट देत असतो.