शाहरुख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) सध्या नॅशनल क्रश झाली आहे. तिच्या लूक आणि फॅशन सेन्सवरून तरुणाई प्रेरणा घेत असते. सुहान झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ (The Archies) मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. काही दिवसांपासून सुहाना आणि अगस्त्य नंदा (Agastya Nanda) यांच्या अफेअरची बातमी समोर आली आहे. ‘द आर्चीज’च्या सेटवरच्या सुत्रांनी माहिती दिली की, सुहाना आणि अगस्त्य (Suhana Khan And Agastya Nanda Affair) रिलेशनशीपमध्ये आहेत. काही दिवसांपुर्वी अगस्त्यने एका ख्रिसमस ब्रंचमध्ये सुहानाची ओळख आपली पार्टनर अशी करुन दिली.
[read_also content=”उद्योजकांच्या भेटी, सिनेसृष्टीला साकडं आणि रोड शोही, योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यानं काय काय साधलं?, BMC निवडणुकांपूर्वी शिवसेना, काँग्रेसला टेन्शन? https://www.navarashtra.com/maharashtra/yogi-aditynath-mumbai-visit-increased-tension-of-shivsena-and-congress-nrsr-359491.html”]
या दोघांचं नातं त्यांच्या दोघांच्या पहिल्या फिल्मच्या म्हणजेच ‘द आर्चीज’च्या शूटींगच्या काळात जोडलं गेलं. अगस्त्यची आई श्वेता बच्चननेदेखील (Shweta Bachchan) त्यांच्या नात्याला स्वीकारलं आहे. दोघांनी शूटींगच्या काळात खूप काळ एकत्र घालवला. सगळ्यांसमोर ते आपल्या नात्याविषयी या दोघांनी काहीही सांगितलेलं नाही. अगस्त्यची आई श्वेताला सुहाना खूप आवडते.सुहाना खान आणि अगस्त्य नंदा सोशल मीडियावरही सक्रीय असतात. ते एकमेकांच्या पोस्टवर कमेंटही करत असतात. सुहानाच्या फोटोवर अगस्त्यने काही दिवसांपूर्वी कमेंट केली होती.
स्टारकिड्सचं पदार्पण
शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) ‘द आर्चीज’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपटातून बोनी कपूर आणि श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरही (Khushi Kapoor) सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. स्टारकिड्रसच्या चा चित्रपटाचा फर्स्ट लूक आणि ट्रेलर रिलीज झाल्याने सगळ्यांना या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.