कशी केली कारवाई?
रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांनी १२ वर्षांच्या मुलाला साखळदंडाने बांधल्याची धक्कदायक घटना दक्षिण नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाच्या पथकाने त्याच्या घरी धडक दिली तेव्हा त्याच्या पायाला लोखंडी साखळदंड आणि कुलूप लावून त्याला घरात कोंडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या हातापायाला जखमा देखील झाल्याचे दिसून आले आहे. मुलगा भयभीत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर मुलाला सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.
या प्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात पालकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर माहिती प्राप्त होताच सदर प्रकार हे फार गंभीर असल्याचे दिसून आल्यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील मेसरे यांच्या अध्यक्षते खाली बाल संरक्षण पथक गठीत करण्यात आले. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, संरक्षण अधिकारी साधना हटवार, कायदा व परीविक्षा अधिकारी सुजाता गुल्हाने, चाईल्ड लाईन प्रतिनिधी मंगला टेंभुर्णे यांनी कारवाई केली आहे.
का ठेवले बांधून
गैरवर्तणूक सुधारण्यासाठी पीडित मुलाच्या आई वडिलांनी त्याला साखळदंडाने बांधून ठेवले. पीडित मुलाने शाळा सोडली असून मुलगा खूप खोडकर होता. तो कोणाचेही ऐकत नव्हता आणि सतत घर सोडून बाहेर पळून जात होता आणि अन्यत्र लोकांचे मोबाईल फोन चोरून आणत होता. तो वस्तीत लोकांना त्रास देत होता. त्याचे हे “गैरवर्तन” थांबवण्यासाठी आणि त्याला घरातच ठेवण्यासाठी त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. दोन महिन्यांपासून ते त्याला असे घरीच कोंडून कामावर जात होते.
मुलाला बालगृहात दाखल करण्यात आले
सदर प्रकार बालहक्कांचे गंभीर उल्लंघन करणारा असून, मुलाला मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत वैद्यकीय तपासणी करून मुलाला बालगृहात दाखल करण्यात आले आहे. पुढील कारवाईसाठी बाल कल्याण समिती समक्ष हजर केली जाणार आहेत. पोलीस बाल न्याय अधिनियम, २०१५ व संबंधित कलमान्वये पुढील तपास करत आहेत. तसेच मुलाच्या वैद्यकीय तपासणीसह समुपदेशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
Ans: मुलगा खोडकर असून घरातून पळून जात असे आणि चोरी करत असल्याच्या कारणावरून पालकांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
Ans: चाईल्ड हेल्पलाइन 1098 वर तक्रार मिळाल्यानंतर बाल संरक्षण कक्षाने तपास केला.
Ans: लाला सुरक्षित बालगृहात हलवण्यात आले असून वैद्यकीय तपासणी व समुपदेशन सुरू आहे.






