Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘लाखात एक आमचा दादा’नंतर निर्माती श्वेता शिंदेची येतेय आणखी एक नवीन मालिका; कधी आणि कुठे ? जाणून घ्या

सध्या वेबसीरीज, वेब शो आणि वेब फिल्मची मोठ्या प्रमाणावर क्रेझ असतानाही प्रेक्षकांमध्ये मालिका पाहण्याचा कल सर्वाधिक आहे. वेब दुनियेत अनेक डेलिसोप सिरीयल्स रिलीज होतात. आता अशातच आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 16, 2025 | 06:23 PM
'लाखात एक आमचा दादा'नंतर निर्माती श्वेता शिंदेची येतेय आणखी एक नवीन मालिका; कधी आणि कुठे ? जाणून घ्या

'लाखात एक आमचा दादा'नंतर निर्माती श्वेता शिंदेची येतेय आणखी एक नवीन मालिका; कधी आणि कुठे ? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

सध्या वेबसीरीज, वेब शो आणि वेब फिल्मची मोठ्या प्रमाणावर क्रेझ असतानाही प्रेक्षकांमध्ये मालिका पाहण्याचा कल सर्वाधिक आहे. सध्याच्या ह्या वेब दुनियेत अनेक डेलिसोप सिरीयल्स रिलीज होत असतात. आता अशातच आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या २१ एप्रिलपासून ‘सन मराठी’वर दररोज सायं. ७ वाजता ‘हुकुमाची राणी ही’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉबी देओलने खरेदी केली अलिशान Range Rover SUV, किंमत ऐकून चक्रावून जाल

‘हुकुमाची राणी ही’ या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या जोडीची लव्हस्टोरी ही फॅक्टरी मधूनच सुरु होणार आहे. मालिकेचं शूटिंगही सातारमधल्या एका खऱ्या फॅक्टरीमध्ये होत आहे. यावेळी पत्रकारांसोबत मालिकेतल्या कलाकारांनीही फॅक्टरीची सफर केली. यावेळी सफर दरम्यान, पत्रकारांना कामगारांची वेशभूषा देऊन कामगारांचा दिवस नक्की कसा असतो, याचा अनुभव देण्यात आला. बरेचदा मालिकांमध्ये ऑफिस, फॅक्टरी या ठिकाणांसाठी सेट उभारला जातो. पण या मालिकेचं शूटिंग साताऱ्यामधील खऱ्या फॅक्टरी मध्ये पार पडणार आहे. त्यामुळे, मालिकेच्या शुटिंग दरम्यान कलाकारांसाठी एक मोठ्या शिताफीने शुटिंग करावी लागणार आहे.

 

निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे मालिकेबद्दल म्हणाली की, “मालिकाविश्वात पहिल्यांदाच खऱ्या फॅक्टरी मध्ये ‘हुकुमाची राणी ही’ मालिकेचं शूटिंग सुरू केलं आहे. हे मोठं पाऊल आम्ही उचललं आहे. याचसह इंद्रजीत व राणीची नवी गोष्ट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाली आहे. या मालिकेसाठी प्रेरणास्थान म्हणायला गेलं तर माझ्या आईची फॅक्टरी आहे. महाडिक इंडस्ट्री मध्ये जशी राणी आहे अगदी तशीच राणी आमच्या फॅक्टरी मध्ये पण होती. आणि त्या राणीला पाहूनच ही गोष्ट सुचली. या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन तर होईलच पण माणुसकी जपण्याचा सल्ला मिळणार आहे. प्रेक्षकांनी मालिकेच्या प्रोमोवर जसा प्रेमाचा वर्षाव केला अगदी तसेच मालिकेवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतील अशी खात्री आहे.”

प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म; जपानी भाषेत ठेवलं नाव

मालिकेत अभिनेत्री वैभवी चव्हाण ही राणीची भूमिका तर इंद्रजीतची भूमिका अक्षय पाटील साकारणार आहे. या दोघांबरोबरच अभिनेत्री अंकिता पनवेलकर,अभिनेते राहुल मेहंदळेंसह आणखी बरेच दिग्गज कलाकारही मालिकेत महत्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत. मालिकेत राहुल मेहंदळे हे जयसिंगराव महाडिक या महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहे. महाडिक इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा जयसिंगराव महाडिक सेवानिवृत्त झाल्यानंतर महाडिक इंडस्ट्रीचा कारभार त्यांच्या मुलाकडे सुपूर्त करतात. जयसिंगराव असा निर्णय घेतात ज्यामुळे राणीचा महाडिक इंडस्ट्रीमध्ये प्रवेश होतो. आता माणुसकी जपणारी राणी व माणुसकी पेक्षा पैशाला महत्त्व देणारा इंद्रजीत समोरासमोर येणार तेव्हा नक्की काय होणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Web Title: Sun marathi new serial hukumachi rani hi new promo out see release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • marathi serial update
  • New Marathi Serial
  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर
1

‘आव्हान वाटणाऱ्या सर्व भूमिका करायला आवडतील’ – रसिका वाखारकर

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग
2

‘कुटुंबासोबत वेळ व्यतीत करण्याची संधी’, सायली ऊर्फ नेहा हरसोराचा स्टार प्लस शुभारंभमध्ये उत्साही सहभाग

‘तुळजाभवानीचा आशिर्वाद म्हणूनच ही भूमिका मिळाली’, देवीच्या भक्तीत लीन पूजा काळे
3

‘तुळजाभवानीचा आशिर्वाद म्हणूनच ही भूमिका मिळाली’, देवीच्या भक्तीत लीन पूजा काळे

हॉरर, सस्पेन्सने भरलेल्या ‘काजळमाया’ मालिकेतील चेटकिणीची मुख्य भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री
4

हॉरर, सस्पेन्सने भरलेल्या ‘काजळमाया’ मालिकेतील चेटकिणीची मुख्य भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.