Actor Bobby Deol Range Rover SUV Car Purchase
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल संदीप रेड्डी वांगाच्या ‘ॲनिमल’ चित्रपटातून सर्वाधिक प्रकाशझोतात आला. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा बॉबी देओल सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आता अभिनेत्याने लक्झरी कार रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. त्याच्या आलिशान कारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अभिनेत्याचे त्याच्या नव्या अलिशान कारसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंमुळेच सध्या बॉबी देओलची चर्चा होत आहे.
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्री झाली आई, दिला गोंडस बाळाला जन्म; जपानी भाषेत ठेवलं नाव
संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर सर्वाधिक प्रकाशझोतात आलेल्या बॉबी देओलचा आता करियर ग्राफ उंचावताना दिसत आहे. अबरारच्या भूमिकेने बॉबीला रातोरात प्रसिद्धी दिली. बॉलिवूडसह टॉलिवूडमध्येही नशिब आजमावू पाहणारा बॉबी सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. बॉलिवूडमध्ये रोमँटिक कॅरेक्टर करणारा बॉबी सध्या टॉलिवूडमध्ये व्हिलनची भूमिका साकारताना दिसतोय. या भूमिकेंच्या माध्यमातूनच अभिनेत्याला सर्वाधिक प्रसिद्धी मिळतेय. दरम्यान, बॉबीने नुकतीच स्वतःच्या मेहनतीवर एक अलिशान कार खरेदी केलीय. त्यामुळे बॉबीची पुन्हा एकदा इंडस्ट्रीत चर्चा होत आहे.
“…म्हणून मी त्याला डेट करत नाही”; अनुष्का शर्माने सांगितलं रणवीर सिंहला डेट न करण्यामागचं खरं कारण
दोन दिवसांपूर्वीच बॉबी देओलने शानदार आणि आलिशान Range Rover SUV कार खरेदी केली आहे. बॉबीने खरेदी केलेल्या या शानदार कारचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉबीच्या ह्या नव्या आलिशान कारची किंमत २.९५ कोटी इतकी आहे. अभिनेत्याने वरळीच्या Land Rover च्या कार शोरुममधून ही नवीन अलिशान कार खरेदी केली आहे. landrover_modimotors.worli या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिनेत्याने कार खरेदी केल्यानंतरचे फोटो शेअर केलेले आहेत. बॉबीने कारसोबत कूल अंदाजात खास फोटोशूटही केलं. ब्लॅक टोपी, ब्लॅक गॉगल लावून बॉबीने कारसोबत खास फोटो काढले. दरम्यान बॉबीने खरेदी केलेली Range Rover SUV कार ब्लॅक कलरची आहे.
View this post on Instagram
A post shared by Land Rover Modi Motors Worli (@landrover_modimotors.worli)
अभिनेता बॉबी देओलने कार खरेदी केल्यानंतर त्याच्यावर इंडस्ट्रीसह चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, बॉबीला गाड्यांचा शौक असून त्याच्याकडे अनेक महागड्या कार्सचं कलेक्शन आहे. बॉबीच्या अनेक महागड्या कार्स कलेक्शनमध्ये आता ताफ्यात ही आणखी एक नव्या कारचा समावेश झाला आहे. बॉबीकडे Land Rover Freelander 2, Range Rover Sport, Range Rover Vogue, Mercedes-Benz S-Class या कार्सचा समावेश आहे.
‘Jaat’ चित्रपटावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप, केली बंदीची मागणी; नेमकं प्रकरण काय ?
बॉबी देओलच्या कामाबद्दल बोलायचे तर, बॉबी देओल २०२४ मध्ये आलेल्या ‘कंगुवा’ या टॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या बॉबीकडे प्रोजेक्टची रांग आहे. जानेवारी २०२५ मध्ये रिलीज झालेल्या ‘डाकू महाराज’ चित्रपटातूनही बॉबी देओल प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तो लवकरच ‘हरी हरा वीरा मल्लू’ या साऊथ चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याशिवाय आलिया भटच्या ‘अल्फा’ चित्रपटातही बॉबी खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे बॉबी देओल सध्या यशाच्या शिखरावर आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.