सनी ने अभिनयात पदार्पण केल्यापासून ती कशी उत्तम अभिनेत्री आणि कलाकार आहे हे तिने कायम दाखवून दिले आहे. बॉलीवूडमधील तिच्या कामासाठी ती मोठ्या प्रमाणावर ओळखली जात असताना तिला तिच्या कामामुळे अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्स मिळाले आहे आणि जगभरात ती अभिनेत्री म्हणून तिने स्वतःच पॅन इंडिया स्टार म्हणून हा दर्जा मजबूत केला आहे. तिची आगामी तामिळ रिलीज ‘कोटेशन गँग’ ज्यामध्ये ती प्रियमणी आणि जॅकी श्रॉफसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे हा चित्रपट तिच्या अभिनय क्षमतांमध्ये आणखी एक भर घालणार असून तिला कधीही न पाहिलेला अवतार ती मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.
प्रियामणी आणि जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या आधीच्या पॅन-इंडियन भूमिकांनी लोकांच्या मनावर मोठा प्रभाव पाडला आहे. तर प्रेक्षक सनी या दोन पॉवर-पॅक कलाकारांसोबत कशी जादू निर्माण करणार हे पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ‘कोटेशन गँग’ मध्ये सनी निर्दयी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. जी तिच्या नेहमीच्या ग्लॅमरस प्रतिमेपासून नक्कीच वेगळी आहे. सनी च्या जुलैमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटासाठी योग्य टोन सेट केला आहे. सनीच्या अभिनय कौशल्यासह जॅकी श्रॉफचे अनुभवी कौशल्य आणि प्रियमणीच्या अष्टपैलुत्वामुळे ‘कोटेशन गँग’ एक समृद्ध आणि स्तरित सिनेमॅटिक अनुभवासह चाहत्यांच्या समोर येणार आहे.
[read_also content=”सनी लिओन-स्टारर ‘कोटेशन गँग’ या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/entertainment/sunny-leone-starrer-quotation-gang-will-meet-the-audience-on-this-day-542110/”]
जॅकी श्रॉफसोबत सनीच्या केमिस्ट्रीसाठी चाहते आधीच उत्सुक आहेत. आणि माफिया सदस्याच्या रूपात तिच्या लूक पाहून चाहत्यांचा चित्रपटाच्या रिलीजसाठी उत्साह वाढला आहे. ‘कोटेशन गँग’ च्या पलीकडे अभिनेत्री अनुराग कश्यप दिग्दर्शित तिच्या ‘केनेडी’ या जागतिक स्तरावर प्रशंसित चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहे. तिचा पाइपलाइनमध्ये हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवासोबत एक शीर्षकहीन चित्रपट आणि निर्मितीमध्ये एक मल्याळम चित्रपट आहे. तसेच सनी लिओनी सध्या ‘Splitsvilla X5’ हा शो होस्ट करताना प्रेक्षकांना दिसत आहे. आणि आता OTT वर ‘ग्लॅम फेम’ जज करण्यासाठी सज्ज आहे.






