छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाशच्या पहिल्या मराठी चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. ती लवकरच ‘मन कस्तुरी रे’ (Man Kasturi Re ) या मराठी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता अभिनय बेर्डेही मुख्य भूमिकेत असून चित्रपट 4 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.
तेजस्वी सध्या टिव्हीवरील प्रसिद्ध मालिक ‘नागिन 6’ मध्ये मुख्य भूमिकेत आहे. ती लवकरच ‘मन कस्तुरी रे’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. तिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या चित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर अनावरण केलंय. पोस्टरमध्ये ती स्कूटी चालवताना अतिशय उत्साहात दिसत आहे. तर अभिनव तिच्या मागे बसलेला असून स्कूटीचा तोल सांभाळताना दिसत आहे.
[read_also content=”भारतीय वंशाची आर्या वाळवेकर ठरली यावर्षीची ‘मिस इंडिया यूएसए’ https://www.navarashtra.com/india/arya-walvekar-won-miss-india-usa-2022-crwon-2022-nrps-313254.html”]
तिने या पोस्टला तीनं साजेसं कॅप्शन दिलयं, “मन सांगे हे मला वेड लागे या जीवा सावरू नको रे तू मला नव्या स्पंदनांची नवी लव्हस्टोरी मन कस्तुरी रे, ४ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात ! #ManKasturiRe #ManKasturiRe4Nov”