'आई कुठे काय करते' मालिकेबद्दल मिलिंद गवळींनी व्यक्त केली मनातली खदखद, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरीही प्रेक्षकांमध्ये अजूनही या मालिकेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेमध्ये अनिरुद्ध नावाचे नकारात्मक पात्र साकारणाऱ्या अभिनेते मिलिंद गवळी यांनी नुकतीच एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्याने मालिकेमध्ये, पत्नीला फसवणारा पती आणि मुलांवर भरभरून प्रेम करणारा बाप असा अनिरुद्ध मालिकेमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला. मिलिंद गवळी यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रेम दिले. आता मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये मिलिंद गवळी यांच्यासह त्यांच्या पत्नी, अभिनेत्री मेधा जांबोटकर, स्मिता जयकर आणि ‘आई कुठे काय करते’च्या लेखिका नमिता वर्तक दिसत आहेत.
‘सबसे कातिल’ गौतमी पाटील अजित कुमारची करणार का शिकार? ‘देवमाणूस-मधला अध्याय’च्या प्रोमोने वेधलं लक्ष