Aamir Khan's mother makes acting debut in Sitaare Zameen Par
आमिर खानचा ‘सितारे जमिन पर’ चित्रपट सध्या सर्वत्र कमालीचा चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वत्र चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. सध्या चित्रपटाच्या प्रमोशनिमित्त आमिर खान व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रमोशनिमित्त आमिर खानने एका मुलाखतीमध्ये त्याची आई झीनत खान ‘सितारे जमिन पर’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगितलं. सोबतच त्याची बहिणही चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आमिरची बहिण निखत आणि आई झीनत पहिल्यांदाच अभिनय करणार आहेत.
‘हाऊसफुल ५’ च्या ओटीटी रिलीजबाबत समोर आले अपडेट, जाणून घ्या कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज?
माध्यमांसोबत संवाद साधताना अभिनेत्याने हे सगळं कसं घडून आलं याबाबत सांगितलं. आमिर खान म्हणाला, “सुरुवातीला माझ्या आईला चित्रपटात घेण्याचा कोणताही विचार नव्हता. पण नंतर हे सर्व अचानक घडले. माझ्या आईने केव्हाही माझ्या कुठल्याही चित्रपटाच्या सेटवर येण्यास रस दाखवला नाही. जेव्हा एक दिवशी मला माझ्या आईने मला विचारले की, तू आजकाल कुठे शूटिंग करत आहे, तेव्हा मी स्तब्ध झालो. मी माझ्या आईला म्हणालो की, “मला आश्चर्य वाटले. तिने यापूर्वी कधीही विचारले नव्हते. पण एक दिवशी सकाळी अचानक तिने मला सांगितले की, तिला सेटवर यायचे आहे.”
कपिल शर्माने ‘Sitaare Zameen Par’च्या कलाकारांना दिले सरप्राईज, व्हिडिओ पाहून चाहते भावुक!
आमिरने पुढे मुलाखती दरम्यान सांगितले की, मी आईच्या इच्छेनंतर माझ्या बहीणीला आणि आईला व्हिलचेअरवरून सेटवर घेऊन आलो. त्या दिवशी सेटवर लग्नाचा सीक्वेन्स आणि डान्स नंबर शूट होत होता. दिग्दर्शक आर.एस. प्रसन्ना यांनी ही संधी म्हणून पाहिली आणि लगेचच आमिरशी ही कल्पना मांडली. त्यांनी मला विचारले की तुझी आई या सीनमध्ये कॅमिओ करेल का? आमिरने पुढे सांगितले की, “सुरुवातीला मला माहित नव्हते की माझी आई यावर काय उत्तर देईल, पण जेव्हा आई आनंदाने ‘हो’ म्हणाली तेव्हा मी आश्चर्यचकित झालो.” आमिर म्हणाला, “ती काही शॉट्ससाठी तिथे होती. हे अजिबात प्लॅनमध्ये नव्हते. पण नंतर तो दिवस आमच्यासाठी शूटिंगमधील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक बनला. हा माझा एकमेव चित्रपट आहे ज्यामध्ये ती एक भाग आहे.”