Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आई तुळजाभवानी’ मालिकेतील राज्याभिषेक सोहळा ठरणार खास, अशा पद्धतीने सुरु आहे दोन महिन्यापासून तयारी…

अलौकीक सौंदर्याचे प्रतीक, अगाध शक्तीचे स्वरूप, अपरिमित वात्सल्याची मूर्ती, धर्मरक्षिण्या आसनस्थ होणार सिंहासनी 'आई तुळजाभवानी'. कलर्स मराठीवर संपन्न होणार आहे आई तुळजाभवानीचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा सप्ताह.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 17, 2025 | 07:16 PM
'आई तुळजाभवानी' मालिकेतील राज्याभिषेक सोहळा ठरणार खास, अशा पद्धतीने सुरु आहे दोन महिन्यापासून तयारी…

'आई तुळजाभवानी' मालिकेतील राज्याभिषेक सोहळा ठरणार खास, अशा पद्धतीने सुरु आहे दोन महिन्यापासून तयारी…

Follow Us
Close
Follow Us:

अलौकीक सौंदर्याचे प्रतीक, अगाध शक्तीचे स्वरूप, अपरिमित वात्सल्याची मूर्ती, धर्मरक्षिण्या आसनस्थ होणार सिंहासनी “आई तुळजाभवानी”. कलर्स मराठीवर संपन्न होणार आहे आई राजा म्हणजेच तुळजाभवानीचा नेत्रदीपक राज्याभिषेक सोहळा सप्ताह. तेव्हा आपण सगळे या सोहळ्याचे साक्षीदार होऊयात. पहा आई तुळजाभवानी राज्याभिषेक सोहळा सप्ताह, सोम १७ मार्च ते शनि २२ मार्च रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

‘सर्वोत्कृष्ट निवेदक’चा पुरस्कार मिळाल्यानंतर समृद्धी केळकरची खास पोस्ट; म्हणाली, “स्पर्धक म्हणून सुरुवात केली होती त्याच…”

आई तुळजाभवानी अर्थात माता पार्वतीचे गुरु भगवान महादेव यांच्या मागर्दशनानुसार भक्तांच्या मनात भयमुक्तीचे बीज रुजवण्यासाठी, दैवी कृपेची ज्योत पेटवण्यासाठी देवीच्या अढळस्थानासोबत तिचे कायमस्वरूपी अधिष्ठान निर्माण होण्यासाठी तिचा राज्याभिषेक आयोजित केला गेला आहे. देवी स्वत:चे महत्व वाढवून घेण्याच्या विरोधात असल्यातरी भक्तांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या अनेक कसोटींच्या क्षणामुळे आणि महिषासुराच्या वाढत्या अत्याचारामुळे देवी राज्याभिषेकाचा प्रस्ताव स्वीकारते. समस्त देवगण, ऋषि, योगिनी ,गण, नंदी, देवीच्या आतापर्यंत पृथ्वीवरच्या निवासादरम्यान जवळचे नाते निर्माण झालेले प्रिय गावकरी यांच्या उपस्थितीत भव्यदिव्य सोहळा संपन्न होणार आहे.

‘गुलाबी साडी’ फेम अभिनेत्रीच्या घरी चिमुकलीचं आगमन; नवऱ्याने शेअर केली ‘गुड न्यूज’…

देवीच्या राज्याभिषेकासाठी संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्या काळानुसार कुठले रंग असतील ? शालू कुठला असेल ? कुठल्या रंगाचं असेल. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे देवीचा मुकुट… देवीच्या देवळात जसा मुकुट आहे तसाच असला पाहिजे. कारण देवी जेवढी तेजस्वी त्या मुकुटात दिसते तेवढी कुठल्याच मुकुटात दिसत नाही. दागिने तब्बल दीड ते दोन महिन्याआधी डिझाईन करून घेतले होते, कारणं देखील बरीच होती त्यामागे… मंगळसूत्राच्या वाटीसारखा दागिना हवा होता. पहिल्या रुपासाठी कलकत्त्यावरून खास दागिने बनविण्यात आले. यावेळेस लूक वेगळा असल्याने खास नवग्रहाचे पेंडन्ट असलेला चोकर खास बनवून घेण्यात आला. शेला तयार करताना आम्हाला खूप वेळ लागला. पण, दोन तीन महिन्यात संपूर्ण लूकची तयारी टीमने केली.

‘या’ साऊथ अभिनेत्याच्या घरी झाली चोरी, चोरट्यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त

या सोहळ्यात आई राजा उदो उदोचा गजर पहिल्यांदा घडेल पण त्याच बरोबरीने देवीने राजदंड हाती घेतल्यानंतर न्यायनिवाड्यासाठी देवी समोर पहिले मागणे मागितले जाईल ते दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडून. ते काय असेल ? देवी काय न्याय देईल ? हा अत्यंत उत्सुकतेचा रंजक कथाभाग या राज्याभिषेक विशेष भागात उलगडणार आहे.

देवीच्या राज्याभिषेकादरम्यान उभा राहिलेला हा पेच आई तुळजाभवानीच्या अवतार कार्याला कोणते वेगळे वळण देणार ? शुक्राचार्यांचे गुरु भगवान महादेव काय भूमिका घेणार ? देवीच्या मंत्रीमंडळात कोण असेल ? प्रत्यक्ष गुरु महादेव समोर असताना देवी राजेपद कसे स्वीकारेल हा नाट्यमय भाग या राज्याभिषेक विशेष भागात दिसणार आहे, बरोबरीने न भूतों न भविष्यती असा अलौकिक सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.

आई तुळजाभवानीच्या अवतार कार्याचा ‘आई राजा’ होण्याचा हा प्रवास, आईची भक्तांच्याप्रती भावनिक गुंतवणूक, आपुलकी, प्रेम यांचे जगावेगळे एकमेव उदाहरण आहे.

Web Title: The coronation ceremony in the series ai tulja bhavani will be special know how the preparations have been going on for two months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 07:16 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial news
  • marathi serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक
1

Zee Marathi Serial : “सगळे त्याचा राग करतात पण…”; हर्षदा खानविलकरने केलं मालिकेतील खलनायकाचं कौतुक

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 
2

फॅनच्या हास्यासाठी ‘इन्स्पेक्टर मंजू’चा प्रवास, “श्रियाला भेटून पाणावले डोळे” 

Tu He Re Maza Mitwa  : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण
3

Tu He Re Maza Mitwa : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”
4

नवरात्रोत्सवात अभिज्ञा भावेने उलगडले तिच्या निस्वार्थ सेवाभावाचं रहस्य, म्हणाली; “मी स्कंदमातेच्या गुणांशी स्वत:ला जोडते”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.